Sameer Wankhede च्या अडचणी वाढल्या, मुंबईच्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचे गंभीर आरोप

विद्या

• 11:01 AM • 23 Nov 2021

आर्यन खान प्रकरणात मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांनंतर NCB च्या मुंबई युनिटचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवरुन राज्यात चांगलाच गदारोळ माजला. वानखेडेंकडून आर्यन खान प्रकरणासह ५ केसचे चौकशीचे अधिकार काढून घेण्यात आले. यानंतरही वानखेडेंच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत. आणखी एका आरोपाने कोर्टाचं दार ठोठावलं असून या वर्षात जुन महिन्यामध्ये झालेल्या एका छापेमारीत […]

Mumbaitak
follow google news

आर्यन खान प्रकरणात मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांनंतर NCB च्या मुंबई युनिटचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवरुन राज्यात चांगलाच गदारोळ माजला. वानखेडेंकडून आर्यन खान प्रकरणासह ५ केसचे चौकशीचे अधिकार काढून घेण्यात आले. यानंतरही वानखेडेंच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत.

हे वाचलं का?

आणखी एका आरोपाने कोर्टाचं दार ठोठावलं असून या वर्षात जुन महिन्यामध्ये झालेल्या एका छापेमारीत आरोपीला अटक केल्यानंतर समीर वानखेडेंनी पंचनामा केलाच नसल्याचं आरोपीचं म्हणणं आहे.

NCB युनिटची नांदेडमध्ये धडक कारवाई, १११ किलो अमली पदार्थ जप्त

श्रेयस अनंत केंजळे असं या आरोपीचं नाव असून तो निवृत्ती पोलीस कर्मचारी ACP केंजळे यांचा मुलगा आहे. श्रेयसला २२ जुन २०२१ रोजी NCB ने रात्री ८ वाजता NDPS Act अंतर्गत अटक केली होती.

‘ओ माय गॉड’ म्हणत मलिकांचं आणखी एक ट्वीट; क्रांती रेडकर म्हणाली ‘हे सगळं फेक’

श्रेयस केंजळेने आपल्या अर्जामध्ये आपल्या घरातलं CCTV फुटेज तपासलं जावं अशी मागणी केली आहे. ज्या सोसायटीमध्ये श्रेयस राहतो त्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत. श्रेयसच्या वडील आणि बहिणीने २१ जूनला ज्यावेळी श्रेयसला ncb चे अधिकारी घेऊन गेले त्यादिवसाचं सीसीटीव्ही फुटेज कोर्टासमोर आणलं आहे. आपल्या मुलाविरुद्ध ncb ने तयार केलेली केस ही खोटी असल्याचंही निवृत्ती पोलीस कर्मचाऱ्याने अर्जात म्हटलं आहे.

२१ जूनला समीर वानखेडे हे छापेमारीच्या वेळी ठिकाणावर हजर होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते दिसतही आहेत. परंतू त्यांचा उल्लेख पंचनाम्यात करण्यात आलेला नाहीये. त्या दिवशी रात्री १० वाजून ५० मिनीटांनी समीर वानखेडे छापा मारल्याच्या ठिकाणावरुन परत गेले होते ही बाब सीसीटीव्हीत दिसत असल्याचं केंजळे यांचं म्हणणं आहे. समीर वानखेडेंचा उल्लेख पंचनाम्यात का नाही याचं कारणही ncb ने दिलेलं नाही असं केंजळे यांनी सांगितलं.

केंजळेंनी या प्रकरणात ncb कडे पंचनामा मागितला. परंतू वारंवार विनंती करुनही ncb केंजळेंना पंचनामा दिला नाही. अखेरीस केंजळेंनी NCB ला ई-मेल लिहील्यानंतर एका अनोळखी व्यक्तीचा त्यांना फोन आला, ज्यात त्या व्यक्तीने एनसीबीला मेल करणं थांबवा नाहीतर तुमच्या मुलाला मोठ्या प्रकरणात अडकवलं जाईल अशी धमकीही दिली. याआधीही झैद राणा या आरोपीने समीर वानखेडेंविरुद्ध अशाच पद्धतीचे आरोप केले होते. दरम्यान या आरोपांवर NCB आपला रिप्लाय या आठवड्याअखेरीस कोर्टासमोर मांडणार आहेत.

    follow whatsapp