राज्यांना लसीकरणासाठी वेगळं APP तयार करण्यासाठी संमती द्या असं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे. लसीकरण करण्यासाठी CoWin हे पोर्टल हँग होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. 1 मे रोजी जेव्हा आपण 18 ते 44 या वयोगाटासाठी लसीकरण सुरू केलं त्यादिवशी हे App क्रॅश झालं होतं. त्यामुळे वेगळं अॅप तयार करण्याची आम्हाला संमती राज्यांना द्यावी. ते अॅप आणि त्यावरील माहिती ही आम्ही केंद्रीय आरोग्य विभागाच्या पोर्टलसोबत किंवा कोविन पोर्टलसोबत जोडू असंही मुख्यमंत्र्यांनी सुचवलं आहे. प्रत्येक राज्यात लसीकरणासाठी वेगळं अॅप तयार करण्यासाठी संमती दिली जावी असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रात लिहिलं आहे.
ADVERTISEMENT
Oxygen च्या बाबतीत महाराष्ट्र लवकरच स्वयंपूर्ण होणार-राजेश टोपे
आणखी काय म्हणाले उद्धव ठाकरे?
महाराष्ट्राला लसींचा तुटवडा भासतो आहे. आम्हाला लागणारे सगळे डोस हे आम्ही एक रकमी चेकने घेण्यासाठीही तयार आहोत. मात्र तेवढ्या लसी उपलब्ध नाहीत. लसीकरणासाठी आम्हाला अधिक लसी प्राप्त झाल्या तर आम्ही आणखी वेगाने लसीकरण करू शकू असं मला वाटतं. कोरोनाची दुसरी लाट सध्या सगळा देश अनुभवतो आहे. अशात लसीकरण हे महत्त्वाचं पाऊल आहे. जास्तीत जास्त लसीकरण करणं हे जसं देशाचं लक्ष्य आहे तसंच महाराष्ट्राचं आहे. त्यामुळे महाराष्ट्राला लसींचा पुरवठा वेळेत आणि योग्य प्रमाणात करावा जेणेकरून ही मोहीमही वेगाने पुढे नेता येईल.
Corona च्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी महाराष्ट्राची तयारी सुरू-राजेश टोपे
काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हमधून जनतेशी संवाद साधला. त्यावेळीच त्यांनी ही बाब बोलून दाखवली होती. एखादं अॅप क्रॅश होऊ शकतं कारण लस मिळणार म्हटल्यावर नोंदणी करण्यासाठी त्या APP वर नोंदणीसाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतात. त्यामुळे या समस्या येणारच यात काहीही शंका नाही. त्यामुळे मी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून उद्धव ठाकरेंच्या कोरोना हाताळणीचं कौतुक केलं आहे. महाराष्ट्र दुसऱ्या लाटेशी चांगली लढाई लढतो आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगितलं आहे. या फोननंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे आणि वेगळं अॅप तयार करण्यासाठी संमती मागितली आहे.
ADVERTISEMENT