बातम्या वाचता वाचता महिला अँकर जमिनीवर कोसळली, थरकाप उडवणारा Video व्हायरल

मुंबई तक

• 08:30 AM • 20 Mar 2023

News Anchor fainted during live Show : देशात गेल्या काही दिवसांपासून नागरीकांमध्ये अचानक कोसळून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकजण डिजेच्या तालावर (Dj Music) नाचत असताना, वर्कआऊट करत असताना, अथवा चालत असताना मृ्त्यू झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. या सर्व प्रकरणात नंतर हार्ट अटॅक (Heart Attack) अथवा कार्डियक अरेस्टमुळे (Cardiac Arrest) नागरीकांचा मृत्यू झाल्याची कारणे […]

Mumbaitak
follow google news

News Anchor fainted during live Show : देशात गेल्या काही दिवसांपासून नागरीकांमध्ये अचानक कोसळून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकजण डिजेच्या तालावर (Dj Music) नाचत असताना, वर्कआऊट करत असताना, अथवा चालत असताना मृ्त्यू झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. या सर्व प्रकरणात नंतर हार्ट अटॅक (Heart Attack) अथवा कार्डियक अरेस्टमुळे (Cardiac Arrest) नागरीकांचा मृत्यू झाल्याची कारणे समोर आली होती. आता अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत एक महिला अँकर न्यूज वाचता वाचता जमीनीवर कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.(american news channel women anchor fainted during live show video viral on social media)

हे वाचलं का?

अमेरीकेच्या एका प्रसिद्ध न्यूज चॅनेलची एक महिला अँकर न्यूज वाचत असताना जमीनीवर कोसळली होती. अचानक घडलेल्या या घटनेने न्यूज चॅनेलच्या कर्मचाऱ्यांसह प्रेक्षकांना मोठा धक्का बसला होता. या महिला अँकरचे नाव एलिसा कार्लसन आहे. एलिसा ही आधीपासूनच हृदयाशी संबंधित आजाराचा सामना करत होती. 2014 साली देखील एलिसासोबत अशीच घटना घडली होती. या घटननंतर तिला हार्ट वॉल्कची समस्या असल्याचे रिपोर्टमध्ये समोर आले होते.

अवघ्या 500 रूपयांसाठी शेजाऱ्यानेच घेतला जीव, संपूर्ण गावं हादरलं!

व्हिडिओत काय?

व्हायरल व्हिडिओत अमेरीकेच्या एका प्रसिद्ध न्यूज चॅनेलचा शो सुरु आहे.या शोमध्ये दोन अॅंकर बसल्या आहेत. हवामानाची बातमी प्रेक्षकांना सांगितली जात आहे. यावेळेस वेदर रिपोर्ट (weather Report) सांगण्यासाठी महिला अॅंकर एलिसा कार्लसनला जोडले जाते. कार्लसन चॅनेलशी कनेक्ट होताच व्यवस्थित हवामानाची बातमी देण्यास सुरुवात करते. मात्र बघता बघता कार्लसनला चक्कर येते आणि ती खाली कोसळते. महिला अॅंकरला असे अचानक कोसळताना पाहून अनेकांना मोठा धक्का बसतो. त्यानंतर तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहुन अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतोय.

अनैतिक संबंधांचा संशय…आईसह 9 महिन्याच्या चिमुकलीला जिवंत जाळलं

देशातील तरूणांमध्ये हृदयासंबंधीत आजार खुप वाढले होते. अनेक तरूण नाचत असताना, जीम करत असताना कोसळून पडल्याच्या घटना समोर आल्या होत्या. या सर्व प्रकरणात तरूणांचा हार्ट अटॅकमुळे (Heart Attack) मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. दरम्यान या घटना तरूणांमध्येच नव्हे तर वृद्ध नागरीकांमध्ये देखील घडत आहे. मात्र सर्वाधिक प्रमाण हे 25 ते 35 या वयोगटात घडतायत. कोरोनामुळे अशा घटनांमध्ये वाढ झाल्याचेही बोलले जात आहे.

Crime : नवऱ्याला सोडून दिरासोबत थाटला संसार; रेल्वे स्टेशनवर सापडाला मृतदेह

दरम्यान ही पहिली वेळ नव्हे, तर अशा अनेक घटनेचे व्हिडिओ (video)तुम्हाला सोशल मीडियावर सापडलीत. हे व्हिडिओ खुपच भयाण असून काळजाचा ठोका चुकवणारे आहेत.

    follow whatsapp