Amit Shah: मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंनी काँग्रेस-NCPचे तळवे चाटले: शाह

मुंबई तक

• 11:16 AM • 18 Feb 2023

Amit Shah venomous criticism: पुणे: शिवसेना (Shiv Sena) पक्ष आण चिन्ह या दोन्ही गोष्टी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) गटाला मिळालाल्यानंतर भाजप (BJP) नेते हे उद्धव ठाकरेंविरोधात (Uddhav Thackeray) चांगलेच आक्रमक झाले आहेत. मोदी@20 (Modi @20) या पुस्तक प्रकाशनाच्या पुण्यातील (Pune) जाहीर कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shaa) यांनीही उद्धव ठाकरेंवर अत्यंत जहरी […]

Mumbaitak
follow google news

Amit Shah venomous criticism: पुणे: शिवसेना (Shiv Sena) पक्ष आण चिन्ह या दोन्ही गोष्टी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) गटाला मिळालाल्यानंतर भाजप (BJP) नेते हे उद्धव ठाकरेंविरोधात (Uddhav Thackeray) चांगलेच आक्रमक झाले आहेत. मोदी@20 (Modi @20) या पुस्तक प्रकाशनाच्या पुण्यातील (Pune) जाहीर कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shaa) यांनीही उद्धव ठाकरेंवर अत्यंत जहरी शब्दात टीका केली आहे. ‘मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेसचे (Congress) तळवे चाटले.’ अशा शब्दात अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली. (uddhav thackeray licked the palms of congress ncp for post of chief minister amit shahs venomous criticism)

हे वाचलं का?

पाहा पुण्याच्या कार्यक्रमात अमित शाह नेमकं काय म्हणाले:

  • उद्धव ठाकरेंनी NCP-काँग्रेसचे तळवे चाटले: अमित शाह

‘कालच एक मोठा विजय आमच्या युतीला मिळाला आहे. शिंदेंच्या शिवसेनेला खरी शिवसेना आणि धनुष्यबाण या दोन्ही गोष्टी मिळाल्या आहेत. एकदा टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा. जी लोकं खोटेपणाच्या आधारावर हुंकार भरत होते त्यांना आज माहित पडलं की, सत्य कोणासोबत आहे.’

2019 च्या निवडणुकीत मी पक्षाचा अध्यक्ष होतो. निवडणूक आम्ही युतीत लढलो. स्वत:च्या फोटोपेक्षा मोदींचा मोठा फोटो लावला. देवेंद्रजींना नेता मानून निवडणूक लढली आणि नंतर मुख्यमंत्री बनणण्यासाठी विरोधी विचारधारा असलेल्यांचे तळवे चाटू लागले. आज त्यांनाच सत्य काय आहे ते कळलं आहे. अशी जहरी टीका अमित शाह यांनी केली आहे.

Uddhav Thackeray: भर उन्हात.. ठाकरेंनी घातला कार्यकर्त्यांच्या काळजालाच हात, भाषण जसंच्या तसं!

  • धोका देणाऱ्यांना माफ करायचं नाही, नाहीतर…: अमित शाह

‘निवडणुकीत हार-जीत होत राहते. पण जे धोका देतात ना त्यांना कधीही माफ केलं नाही पाहिजे. नाहीतर धोका देणाऱ्यांची हिंमत वाढते. काल मी शिंदेंचं भाषण ऐकलं, पत्रकार परिषद ऐकली. एका पत्रकाराने विचारलं की, धनुष्यबाण आपल्याला मिळाला.. तेव्हा ते म्हणाले की, धनुष्यबाण आम्हाला मिळाला नाही. तर आम्ही तो राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे गहाण पडला होता तो आम्ही सोडवून आणला.’

‘आमचं तर सोडा… यांनी तर बाळासाहेबांची विचारधारा आणि शिवसैनिकांसोबतही दगाबाजी केली आहे. आज दूध का दूध और पानी का पानी झालं आहे.’ असं म्हणत अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना माफ करतान कामा नये असं यावेळी म्हटलं.

Devendra Fadnavis: ’20-20 ची मॅच आहे, अडीच वर्ष वाया गेली पण..’, फडणवीसांचा टोला

  • अमित शाहांनी पुण्यातील कार्यकर्त्यांना अमित शाहांनी केलं खास आवाहन..

दरम्यान, याच कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना एक खास आवाहन केलं. ते यावेळी म्हणाले की, ‘भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील पुण्यातील आणि आसपासच्या तीनही जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आज एक संकल्प करायचा आहे की, आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व जागा या शिवसेना-भाजप युतीच्या खात्यात जातील.’ असं म्हणत अमित शाहांनी कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन केलं.

    follow whatsapp