संसदेचं पावसाळी अधिवेशन सोमवारपासून म्हणजेच आजपासून सुरू झालं आहे. मात्र या अधिवेशनात जो हंगामा विरोधकांनी केला त्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारवर Pegasus प्रकरणी जे आरोप लावण्यात आले आहेत ते आरोप म्हणजे देशाचा अपमान करण्याचा आणि देशाची प्रतिमा मलीन कऱण्याचा प्रयत्न आहे असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर किती कट रचा, षडयंत्र रचा मात्र या देशाची विकासयात्रा थांबणार नाही हे लक्षात असू द्या असं म्हणत त्यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले आहेत.
ADVERTISEMENT
पावसाळी अधिवेशनात जी विधेयकं येतील त्यातून विकासाचे नवे मार्ग देशाला मिळतील अशी मला अपेक्षा आहे असंही अमित शाह यांनी सांगितलं. इस्रायलच्या पेगासस स्पायवेअरकडून 300 जणांचे फोन टॅप केल्याची चर्चा आहे. अशात आता अमित शाह यांनी या आरोपांच्या टायमिंगचा मुद्दा समोर आणला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या बरोबर एक दिवस आधीच कसे हे आरोप सुरू झाले असा प्रश्न अमित शाह यांनी विचारला आहे.
अमित शाह पुन्हा एकदा म्हणाले क्रोनोलॉजी समझनी चाहिये..
देशाच्या लोकशाहीला बदनाम करण्यासाठी पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला एक अहवाल सादर होतो. हा अहवाल काही लोक निव्वळ अशासाठी पसरवतात की ज्यामुळे भारताच्या विकासाला खिळ बसावी. भारताच्या लोकशाहीचा अपमान आणि बदनामी व्हावी हाच यामागचा उद्देश आहे. आपल्याला यासंदर्भातली क्रोनोलॉजी समजून घ्यायला हवी. हा अहवाल म्हणजे भारताच्या विकासात विघ्न आणू पाहणाऱे हे गतिरोधक आहे. काँग्रेसचं अस्तित्व आता संपल्यात जमा आहे तसंच त्या पक्षाचं राजकीय महत्त्वही कमी झालं आहे. एवढंच नाही तर लोकशाहीला पायदळी कसं तुडवायचं हे काँग्रेसला व्यवस्थित माहित आहे असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.
काय आहे Pegasus Spyware? ते कसं काम करतं आणि WhatsApp कसं हॅक करतं?
काय आहे प्रकरण?
भारतातील मंत्री, विरोधी पक्षनेते, वकील, सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपती आणि पत्रकारांसह 300 जणांचे फोन टॅप झाल्याची माहिती वॉशिंग्टन पोस्टसह 16 आंतरराष्ट्रीय माध्यमांनी ब्रेक केली….हे फोन टॅप करण्यासाठी पेगासस हे टूल वापरण्यात आलेलं….असं म्हणतात की हे टूल वापरल्याने तुम्ही कुणाशी बोलता, काय बोलता, काय करता हे सगळं हेरगिरी करण्याला समजतं. हा आरोप काँग्रेसकडून केला जातो आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांनी संसदेत हंगामा केला आणि दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब करावं लागलं.
आता या सगळ्या प्रकरणी भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसंच विरोधकांकडून भारताच्या विकासाला खिळ घालण्याचा प्रयत्न होतो आहे असाही आरोप केला आहे.
ADVERTISEMENT