अमित शाह-उद्धव ठाकरेंच्या भेटीमुळे महाराष्ट्राला झाली बंद दाराआडच्या भेटीची आठवण!

मुंबई तक

• 02:03 PM • 27 Sep 2021

महाराष्ट्राचे गृहमंत्री अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची रविवारी भेट झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेले होते. दिल्लीला गेल्यानंतर या दोघांनी एकत्र जेवण सोबत केलं. साधारणतः दोन वर्षांनंतर अमित शाह आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांना भेटले. या दोन नेत्यांची भेट झाल्यानंतर दोन्ही महाराष्ट्राला दोन वर्षांपूर्वी झालेल्या बंद दाराआडच्या चर्चेची आठवण झाली. या बंद दाराआडच्या […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्राचे गृहमंत्री अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची रविवारी भेट झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेले होते. दिल्लीला गेल्यानंतर या दोघांनी एकत्र जेवण सोबत केलं. साधारणतः दोन वर्षांनंतर अमित शाह आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांना भेटले. या दोन नेत्यांची भेट झाल्यानंतर दोन्ही महाराष्ट्राला दोन वर्षांपूर्वी झालेल्या बंद दाराआडच्या चर्चेची आठवण झाली. या बंद दाराआडच्या चर्चेने महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी मिळाली.

हे वाचलं का?

बंद दाराआडची चर्चा आणि महाराष्ट्राचं राजकारणच बदललं..

2019 मध्ये उद्धव ठाकरे, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची मातोश्रीवर भेट झाली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि अमित शाह या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. या बंद दाराआडच्या चर्चेनेच महाराष्ट्रातली समीकरणं बिघडणार आहेत किंवा बंद दाराआडची चर्चाच त्याची नांदी ठरणार आहे असं त्यावेळी कुणालाही वाटलं नव्हतं. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरे देणारी ही बंद दाराआडची चर्चाच ठरली. या बंद दाराआडच्या चर्चेत नेमकी काय वचनं घेतली गेली त्याचे संदर्भ अजूनही कुणाला कळलेले नाहीत. पण दोन्ही नेत्यांनी उद्धव ठाकरे आणि अमित शाह या दोन्ही नेत्यांनी आपण काय बोललो होतो हे सांगितलं आहे.

ही भेट झाल्यानंतर अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेचा 50-50 टक्के जागावाटपाचा फॉर्म्युला आहे असं सांगितलं. त्यानंतर महायुतीने विधानसभा निवडणूक लढवली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी विरूद्ध महायुती असा हा सामना 2019 मध्ये झाला. शिवसेनेचे 54 आमदार निवडून आले आणि भाजपचे 105 आमदार निवडून आले. त्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीचंच सरकार येणार हाच जनमताचा कौल होता.

मात्र नेमकी इथेच आडवी आली ती बंद दाराआडची चर्चा. शिवसेनेने मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्षे वाटून घ्यावं ही अट पाठिंबा देण्यासाठी ठेवली. त्यानंतर काय घडलं ते महाराष्ट्राला माहित आहेच. महाराष्ट्राला अपेक्षित नसलेला प्रयोग 2019 मध्ये महाराष्ट्रात घडला. तो प्रयोग होता महाविकास आघाडीचा. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. त्याआधी अजित पवारांना सोबत घेत देवेंद्र फडणवीसांनी पहाटेच शपथ घेत शिवसेनेला आम्हीही काही कमी नाही हे दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न यशस्वी झाला नाही.

शरद पवारांनी अजित पवारांचं बंड मोडून काढलं त्यानंतर अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेले सगळे आमदार मागे फिरले. त्यानंतर झाला तो महाविकास आघाडीचा अभूतपूर्व प्रयोग महाराष्ट्रात घडला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले. त्यांनी सत्ता स्थापन केली. त्यानंतर महाराष्ट्रात आणि राजकारणात काहीही घडू शकतो यावर जाणकारांचं एकमत झालं.

एप्रिल ते मे 2019 या दरम्यान सात टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडली.परंतु निवडणुकीनंतर भाजपची स्थिती अटीतटीची होऊ शकते असं अनेक मतदानपूर्व चाचण्यातून समोर आलं होतं. बहुमत न मिळाल्यास मित्रपक्षांची गरज लागणार हे ओळखून भाजपनं शिवसेनेसारख्या जुन्या मित्रांशी जुळवून घ्यायला सुरुवात केली होती, हे उघड होतं. अमित शहांची ‘मातोश्री’ भेट त्याच तडजोडीचा भाग होती.

मात्र बालाकोट प्रकरणानंतर भाजपने प्रचारात राष्ट्रवादाचा मुद्दा प्रकर्षाने आणला आणि भाजपला घवघवीत यश मिळालं.

23 मे 2019 रोजी मतमोजणी झाली आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीने 542 पैकी (NDA) तब्बल 350 जागा जिंकल्या. भाजपने 303 जागा जिंकत स्वबळावर सलग दुसऱ्यांदा स्पष्ट बहुमत मिळवलं.

लोकसभा निकालानंतर केंद्रात भाजपला आपली मदत लागेल आणि त्याबदल्यात राज्यात आपल्या पदरात काहीतरी पाडून घेता येईल असा विचार शिवसेना करत होती. परंतु तसं काहीच घडलं नाही आणि आता शिवसेनेला भाजपचं ऐकावं लागेल असं चित्र दिसू लागलं. अखेर तसं घडलं सुद्धा.

ऑक्टोबर 2019 मध्ये शिवसेना आणि भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी आपली उमेदवार यादी जाहीर केली आणि पहिल्यांदाच शिवसेनेला 150 पेक्षा कमी जगा दिल्या गेल्या. शिवसेनेने 124 आणि भाजपने इतर मित्रपक्षांसह 164 जागा लढवल्या.यानंतर शिवसेनेतील खदखद वाढतच गेली. भाजपने शिवसेनेचं महत्त्व कमी केलं, ग्रामीण भागात शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातही भाजप वरचढ ठरण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली.

अमित शाह-शरद पवार भेटीबाबत संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

विधानसभा निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे देण्याचं ठरलं आहे असंच या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी सांगितलं. तसंच पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल असं स्पष्ट करण्यात आलं. हा दावा उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला. मात्र भाजपने हा दावा खोडून काढला असं काही ठरलंच नव्हतं असं भाजपने सांगितलं आणि तिथून या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

त्यावेळी अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा जरूर झाली होती. मात्र अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याबाबत काहीही ठरलं नव्हतं. अमित शाह यांना मी रात्री दोन वाजता फोन करून विचारलं होतं मात्र तेव्हा त्यांनीही मला असं काहीही ठरलं नसल्याचं सांगितलं होतं. असंही देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं.

‘मी बंद खोलीत वचनं देत नाही’, पाहा अमित शाह सेनेबाबत काय म्हणाले!

अमित शाह काय म्हणाले?

7 फेब्रुवारीला अमित शाह हे जेव्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी त्यांच्या भाषणात बंद दाराआडच्या चर्चेबाबत भाष्य केलं.

‘राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार हे सर्व पातळीवर अपयशी ठरलं आहे. मी आज महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायला आलो आहे की, आपण जो जनादेश दिला होता. त्या पवित्र जनादेशाचा अनादर करुन सत्तेच्या लालसेपोटी नवं सरकार स्थापन केलं. त्यावेळी जनादेश काय होता तर भाजप आणि शिवसेनेचं सरकार व्हावं. पण यांनी सत्तेच्या लालसेपायी जनादेश धुडकावून लावला. जे म्हणतात आम्ही वचन तोडलं त्यांना आम्ही सांगू इच्छितो की, आम्ही दिलेल्या वचनावर ठाम राहणारे लोक आहोत. या पद्धतीचं खोटं आम्ही बोलत नाही. बिहारमध्ये आम्ही नितीशजींच्या सोबत निवडणूक लढवली. तिथे आमच्या जागा जास्त आल्या आणि त्यांच्या कमी. त्यावेळी नितीश कुमार राजकारणाच्या हिशोबाने बोलले देखील की, आपण भाजपचा मुख्यमंत्री बनवा कारण इथे आपले जास्त आमदार निवडून आले आहेत. पण भाजपच्या नेतृत्वाने निर्णय घेतला की, भाजप दिलेला शब्द कधीही मोडत नाही आणि आज नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री आहेत. आणि हे सांगतात आम्ही त्यांना एका बंद खोलीत वचन दिलं होतं आणि ते देखील मी त्यांना वचन दिलं होतं.’

‘मी काहीही बंद खोलीत वचनं देत नाही. जी काही वचनं देतो ती खुलेपणाने, सार्वजनिकरित्या. मी कधीही बंद खोलीचं राजकारण केलं नाही. मी जनतेत राहणारा माणूस आहे. त्यामुळे मी कुणालाही घाबरत नाही. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतोय की, मी असं कोणतंही वचन दिलेलं नव्हतं.’

‘चला एकवेळ मान्य करुयात की, मी त्यांना वचन दिलं होतं. तर उद्धवजी आपल्या प्रत्येक उमेदवाराच्या बॅनरवर आपल्यापेक्षा मोठा फोटो मोदीजींचा होता आणि त्यांच्याच नावावर आपण मतं मागितली. अनेक ठिकाणी आपली माझ्यासोबत रॅली झाली, सभा झाली त्या-त्या ठिकाणी आम्ही म्हटलं की, फडणवीस हे एनडीएचे नेते आहेत आणि तेच मुख्यमंत्री बनतील. त्यावेळी आपण का काही बोलला नाहीत? पण मित्रांनो मी सांगू इच्छितो की, अशी कोणतीही बातचीत आमच्यात झाली नव्हती. सत्तेच्या मोहापायी बाळासाहेब ठाकरेंचे सगळे सिद्धांत तापी नदीत टाकून हे सत्तेवर बसले.’

    follow whatsapp