राजकारणात आणि राजकारणापलिकडे कोण कुणाकडे कशासाठी मदत मागेल याचा नेम नाही. हे आता सांगण्याचं कारण म्हणजे अमित शाह यांच्या मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतलीये. केंद्रीय सहकार मंत्रालयाचे सचिव, सह सचिव आणि उपसंचालकांनी भेट घेऊन शरद पवार यांना मंत्रालयाच्या काम प्रभावीपणे करण्यासाठी सूचना करण्याची विनंती केली.
ADVERTISEMENT
मोदी सरकारने देशात सहकार मंत्रालय स्थापन केलं. या मंत्रालयाची जबाबदारी दिली, ती केंद्रीय गृहमंत्री असलेल्या अमित शाह यांच्याकडे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सहकारात मोठं वर्चस्व आहे. त्याचबरोबर सहकारी संस्थांमध्ये अनेक गैरव्यवहाराचे आरोपही झालेत. त्यामुळे केंद्राने सहकार मंत्रालय स्थापन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न होईल, अशी चर्चा सुरू झाली होती.
दीपक केसरकरांच्या आरोपावर शरद पवारांचं एका वाक्यात प्रत्युत्तर, म्हणाले महत्त्व…
अमित शाह यांच्या शिष्टमंडळाने शरद पवारांची घरी जाऊन घेतली भेट
सहकार मंत्रालयासंदर्भातील एक मोठी घडमोड समोर आलीये. अमित शाह यांच्याकडे असलेल्या सहकार मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवारांच्या दिल्लीतील घरी अधिकाऱ्यांनी चर्चा केली. केंद्रीय सहकार मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश कुमार, सहसचिव पंकज कुमार बन्सल, उपसंचालक सुचेता, सहकार मंत्रालयाचे मुख्य संचालक ललित गोयल यांच्या शिष्टमंडळाने ही भेट घेतली.
अधिकाऱ्यांनी शरद पवारांना काय केली विनंती?
शरद पवारांनी त्यांच्या ट्विटवरून याची माहिती दिली. यावेळी झालेल्या चर्चेत अधिकाऱ्यांनी सहकार मंत्रालयाचं काम अधिक प्रभावी होण्यासाठी सूचना करण्याची विनंती केली. शरद पवार यांचं देशातील राजकारणात महत्त्वाचं स्थान आहे. त्याचबरोबर त्यांना सहकार क्षेत्रातील दांडगा अनुभव आहे. त्यांच्या अनुभवाचा उल्लेख करतच अधिकाऱ्यांनी त्यांना सहकार मंत्रालयाच्या कामाबद्दल सूचना करण्याची विनंती केलीये.
राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र निवडणुका लढणार?; राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवार काय म्हणाले?
खरा चाणक्य कोण, अशी तुलना नेहमीच शरद पवार आणि अमित शाह यांच्यामध्ये पक्ष कार्यकर्त्यांकडून होत असते. विशेषतः २०१९ च्या बदललेल्या सत्ता समीकरणापासून ही चर्चा अधूनमधून डोकं वर काढत असते. त्यातच आता सहकार मंत्रालयाच्या शिष्टमंडळाने शरद पवारांची भेट घेतलीये. त्यामुळे राष्ट्रवादी-भाजपमध्ये ‘चाणक्य’वरून पुन्हा कलगीतुरा बघायला मिळू शकतो.
ADVERTISEMENT