नवी दिल्ली : बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या बेड रेस्टवर आहेत. ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांना दुखापत झाली आहे. त्यानंतर त्यांना डॉक्टरांनी काही काळ विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मात्र या दरम्यानही बच्चन यांनी त्यांच्या सर्व प्रियजनांना त्यांच्या तब्येतीचे अपडेट्स दिले आहेत. तसंच चाहत्यांच्या प्रेमाबद्दल त्यांचे आभारही मानले आहेत. (Seeing the concern of the fans, now Amitabh Bachchan has given an update about his health.)
ADVERTISEMENT
आता अमिताभ बच्चन यांची तब्येत कशी आहे?
अमिताभ बच्चन यांच्या दुखापतीची बातमी समोर येताच देशभरातील त्यांचे चाहते चिंतेत पडले होते. त्यांच्या तब्येतीची सगळ्यांनाच काळजी लागली होती. अमिताभ यांच्या बरगडीला दुखापत झाली होती. त्यांना श्वास घेण्यासही त्रास होत होता. बच्चन यांनी ब्लॉगवर माहिती देताना म्हटलं की, त्यांना शरीरात तीव्र वेदना होत असून ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते विश्रांती घेत आहेत.
दरम्यान, चाहत्यांची चिंता पाहून आता अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या तब्येतीबाबत अपडेट दिले आहेत. बिग बी यांनी पोस्ट करतं म्हटलं की, ज्यांनी त्यांच्या दुखापतीबद्दल चिंता व्यक्त केली, त्या सर्व लोकांच्या प्रार्थना आणि प्रेमाबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे. तुम्ही दिलेल्या अटेंन्शनमुळे मी आभार मानतो. मी हळू हळू बरे होईन थोडा वेळ लागेल. डॉक्टरांनी जे काही सल्ले दिले आहेत ते मी पाळतो. अमिताभ बच्चन यांनी असेही सांगितलं की, दुखापतीमुळे त्यांची सर्व कामं सध्या थांबवण्यात आली आहेत. त्यांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यावर आणि जेव्हा डॉक्टर त्यांना परवानगी देतील तेव्हाच ते नियमीत कामावर परततील.
Amitabh Bachchan: बिग बी म्हणाले, आता चाहत्यांना भेटू शकणार नाही!
जलसामध्ये अमिताभ यांनी केले होलिका दहन :
अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या जलसा येथील घरी बेड रेस्टवर आहेत. काल रात्री त्यांनी घरातच होलिका दहन केले. यापूर्वी होळीच्या तारखेबाबत काही गोंधळ होता, मात्र आता त्याबाबत स्पष्ट झालं आहे, असेही त्यांनी सांगितले. आज आणि उद्या होळीचा सण साजरा केला जाईल, असे अमिताभ बच्चन यांनी सांगितले. यासोबतच त्याने आपल्या चाहत्यांना होळीच्या अनेक शुभेच्छाही दिल्या.
Amitabh Bachchan: कुलीच्या सेटवर झाले घायाळ ते हात जळण्यापर्यंत… बिग बींचे अनेकदा झाले अपघात
अमिताभ बच्चन कसे झाले जखमी?
अमिताभ बच्चन त्यांच्या चित्रपटाचे शूटिंग करत होते. त्यानंतर अॅक्शन सीन करताना बिग बींना दुखापत झाली, त्यानंतर शूटिंग रद्द करावं लागलं होतं. या अपघाताची माहिती अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे दिली होती. हैदराबादमध्ये ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दुखापत झाल्याचं त्यांनी सांगितलं. या अपघातात अमिताभ बच्चन जखमी झाले आहेत. त्यांच्या बरगडीला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांना आता श्वास घेताना आणि हालचाल करतानाही त्रास होत आहे.
ADVERTISEMENT