बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांचा जलवा आजपण कायम आहे. वयाची 80 गाठली तरी त्यांची काम करण्याची पद्धत तरुणांप्रमाणे आहे. आज देखील अनेक चित्रपट ते करत आहेत. त्यांनी काहीही केलं तर त्याची चर्चा होते. नुकतंच त्यांनी एक प्रॉपर्टी विकत घेतली आहे. जी मुंबईच्या पॉश भागात आहे. हे घर जितकं आलिशान आहे त्याची किंमत देखील तितकीच तगडी आहे. बच्चन यांनी पूर्ण फ्लोर विकत घेतलं आहे, जो जवळपास 12 हजार स्क्वेर फूट आहे.
ADVERTISEMENT
प्रत्येक अपार्टमेंटची किंमत इतक्या कोटीची
रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील फोर बंगला परिसरात पार्थेनॉन बिल्डिंगच्या 31व्या मजल्यावर एक आलिशान घर खरेदी केले आहे. हे घर 12 हजार चौरस फुटांचे आहे. अमिताभ यांनी संपूर्ण मजला विकत घेतला आहे. या प्रकल्पात एका मजल्यावर फक्त दोन 4.5 bhk अपार्टमेंट आहेत. त्या बनवताना वास्तूची काळजी घेण्यात आली आहे. कार्पेट एरिया 3378 चौरस फूट आहे. प्रत्येक अपार्टमेंटची किंमत 14.5 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
अनेक बंगले अमिताभ यांच्या नावावर आहेत
अमिताभ बच्चन सध्या ज्या बंगल्यात आपल्या कुटुंबासह राहतात त्या बंगल्याचे नाव जलसा ठेवण्यात आले आहे. याशिवाय त्यांचा प्रतीक्षा नावाचा बंगलाही आहे. याआधीही 2021 मध्ये अमिताभ यांनी एक प्रॉपर्टी खरेदी केली होती. ज्यावरून ते खूप चर्चेत आले होते. त्यांनी 2021 मध्ये 31 कोटींचे घर घेतले होते. 2020 मध्ये त्यांनी हे घर विकत घेतले असले तरी 2021 मध्ये त्याची रजिस्ट्री करून घेतली. अमिताभ यांनी यासाठी 62 लाख रुपये मुद्रांक शुल्क भरल्याचे वृत्त होते.
अमिताभ बच्चन यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांची संपत्ती
अमिताभ यांच्या नावावर कोट्यवधींची संपत्ती आहे. अमिताभ अनेकदा मालमत्ता खरेदीसाठी पैसे गुंतवत असतात. 2013 मध्ये देखील त्यांनी एक प्रॉपर्टी खरेदी केली होती. त्यानंतर त्यांनी जुहू येथील त्यांच्या ‘जलसा’ बंगल्याच्या मागे असलेला दुसरा बंगला विकत घेतला, ज्याची किंमत ५० कोटींहून अधिक असल्याचे सांगितले जाते. चाहते अमिताभ यांच्या बंगल्याबाहेर फोटो काढण्यासाठी जातात. लोकांची गर्दी अनेकदा पाहायला मिळते.
ADVERTISEMENT