कोव्हिड सेंटरच्या मदतीसाठी महानायक अमिताभ बच्चन यांचा पुढाकार

मुंबई तक

• 07:40 AM • 10 May 2021

देशात कोरोनाने कहर माजवलाय. रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. अशातच बेड्स तसंच ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडल्याचं चित्र आहे. या गोष्टींची कमतरता भासू नये यासाठी अनेक सेलिब्रिटींनी पुढाकार घेतलाय. यामध्येच आता बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. अमिताभ बच्चन यांनी दिल्ली कोविड सेंटरसाठी 2 कोटी रुपयांची मदत केली आहे. दिल्लीच्या शीख गुरुद्वारा मॅनजमेंट […]

Mumbaitak
follow google news

देशात कोरोनाने कहर माजवलाय. रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. अशातच बेड्स तसंच ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडल्याचं चित्र आहे. या गोष्टींची कमतरता भासू नये यासाठी अनेक सेलिब्रिटींनी पुढाकार घेतलाय. यामध्येच आता बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे.

हे वाचलं का?

अमिताभ बच्चन यांनी दिल्ली कोविड सेंटरसाठी 2 कोटी रुपयांची मदत केली आहे. दिल्लीच्या शीख गुरुद्वारा मॅनजमेंट कमिटीचे अध्यक्ष मनजिंदर सिंह सिरसा यांनी याबाबत माहिती दिली आहे.

मनजिंदर सिंह सिरसा यांनी याबाबत ट्विट केलं आहे. ते त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, अमिताभ बच्चन यांनी श्री गुरु तेग बहादुर कोविड केअर फॅसिलिटीसाठी 2 कोटींची मदत केली आहे. इतकंच नाही तर अमिताभ मला रोज फोन करुन विचारत देखील करत असतात. ते म्हणतात, तुम्ही पैशांची चिंता करू नका…प्रयत्न करा आपण अधिकाअधिक जीव वाचवू शकू.”

दरम्यान नुकतंच अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी सध्याच्या कठीण परिस्थितीत जे लोकं कोरोनाशी लढत आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना केलेली. त्याचसोबत अमिताभ यांनी सुरक्षित राहून नियमांचं पालन करण्यास सांगितलं होतं.

    follow whatsapp