खासदार कोल्हेंना कोरोनाचा संसर्ग; BMC च्या रुग्णालयात झाले दाखल; ट्विट करून म्हणाले…

मुंबई तक

• 05:10 PM • 20 Aug 2021

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. अमोल कोल्हे यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली. सध्या ते उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोल्हे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली. ‘कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही. गेल्या दोन […]

Mumbaitak
follow google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. अमोल कोल्हे यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली. सध्या ते उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोल्हे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

हे वाचलं का?

खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली. ‘कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही. गेल्या दोन दिवसांपासून मला कोरोना सदृश लक्षणं दिसत आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोनही डोस पूर्ण झाले आहेत. तरीही चाचणी केल्यानंतर माझा आरटी-पीसीआर अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती स्थिर आहे’, अशी माहिती खासदार कोल्हे यांनी दिली.

‘डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत. मतदारसंघातील पूर्वनियोजित दौरा सर्व कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना आवाहन आहे की, त्यांनी लक्षणं आढळून आल्यास टेस्ट करुन घ्यावी. शक्यतो गर्दीची ठिकाण टाळावीत व निर्धारित नियमांचे काटेकोर पालन करावे’, असं आवाहनही कोल्हे यांनी नागरिकांना केलं आहे.

‘महाराष्ट्र शासनाची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षम असून, यावर माझा विश्वास आहे. म्हणूनच कोरोना पॉजिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर शासकीय रुग्णालयाचा पर्याय निवडला. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या ‘सेव्हन हिल्स रुग्णालयात’ उपचारासाठी दाखल झालो आहे’, अशी माहिती देत सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेबद्दल त्यांनी विश्वास व्यक्त केला.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली, तरी कोरोना संसर्गाचा धोका अजूनही कमी झालेला नाही. कोरोना लसीचे दोन डोस घेऊनही कोरोना झाल्याचं समोर येत आहे. परदेशातही अनेक देशात लस घेऊनही कोरोनाचा संसर्ग होत असल्याची प्रकरणं समोर आली. मात्र, लसीमुळे कोरोनामुळे होणारा गंभीर परिणाम टळत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

    follow whatsapp