ADVERTISEMENT
‘वारिस पंजाब दे’ या संघटेनेचा प्रमुख अमृतपाल सिंग अजूनही पोलिसांना चकमा देत आहे.
पंजाब पोलिसांनी अमृतपाल सिंगचे काही फोटो प्रसिद्ध केले आहेत. ज्यामध्ये त्याचा लूक वेगवेगळा दिसत आहे.
काही फोटोत अमृतपाल सिंग छोटे केस, क्लिन शेव्ह आणि पगडी न परिधान केलेला दिसत आहे.
पंजाब पोलिसांनी जारी केलेल्या फोटोमध्ये अमृतपाल सिंग खूपच तरुण दिसतोय.
अमृतपालला पकडण्यासाठी पोलिसांनी 15 दिवसांआधीच मास्टर प्लान तयार केलेला असूनही ते अपयशी ठरले आहेत.
अशा स्थितीत पंजाब पोलिसांच्या या ऑपरेशनवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
पोलिसांच्या या ऑपरेशनची माहिती लीक झाली का? असा पहिला प्रश्न विचारला जात आहे.
पंजाब पोलीस दलातील अनेक मोठ-मोठे अधिकारी या ऑपरेशनमध्ये सामील असूनही अमृतपालच्या केवळ गाड्या मिळाल्या आहेत पण तो नाही.
पोलिसांनी अमृतपालला पकडण्यासाठी नाकाबंदी केली, त्याला पळवलं, पाठलाग केला मात्र अजूनही तो फरारच आहे.
ADVERTISEMENT