होय मी भक्त आहे आणि मला गर्व आहे असं म्हणत अमृता फडणवीस यांनी केलेलं एक ट्विट सध्या चांगलंच चर्चेत आहे. हाँ मै भक्त हूँ! और मुझे गर्व है असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे. या ट्विटमध्ये एक आलेख दिला आहे. त्यामध्ये सर्वाधिक लसीकरण भारतात झालं आहे हे दाखवलं गेलं आहे. भारतात 32 कोटी 36 लाखांपेक्षा जास्त लोकांचं लसीकरण जास्त आहे. या तुलनेत USA, UK, जर्मनी, फ्रान्स, इटली या देशांमध्ये कमी लसीकरण झालं आहे असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
अमृता फडणवीस म्हणाल्या… ‘ए भाई, तू कोण पण असशील!’
मी भक्त आहे आणि मला गर्व आहे असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं. अमृता फडणवीस यांनी केलेल्या या ट्विटला 600 पेक्षा जास्त लोकांनी रिट्विट केलं आहे. तर 3700 पेक्षा जास्त लोकांनी हे ट्विट लाईक केलं आहे. तर 200 पेक्षा जास्त लोकांनी या ट्विटला रिप्लाय केला आहे. अनेक भक्त हे कोरोनाचे मृत्यू टक्केवारीमध्ये मोजतात आणि लसीकरण संख्येमध्ये मोजतात. 23 जून ची आकडेवारी देऊन एका युझरने म्हटलं आहे की भारतात फक्त चार टक्के लसीकरण झालं आहे. एका युझरने म्हटलं आहे की भारताची लोकसंख्या 135 कोटी आहे. लसीचे एकूण डोस लागणार आहेत 270 कोटी आहे. आत्तापर्यंत लसीकरण झालंय आहे 32 कोटींपेक्षा जास्त. हा यांना माईलस्टोन वाटतोय आणि गर्वाची बाब वाटते आहे. हे निर्बुद्ध भक्काचे लक्षण आहे असं म्हणत टीका केली आहे.
महिला दिन विशेष: ट्रोलिंगला घाबरणा-यांना अमृता फडणवीस सांगतात..
गर्वाचे घर खाली असते गणित शिकला असाल तर लोकसंख्या तपासा असा रिप्लाय एका युझरने दिला आहे. आम्हाला माहित आहे तुम्ही भक्त आहात यात नवीन काहीच नाही असं एका युझरने म्हटलं आहे. या ट्विटवरून अमृता फडणवीस या चांगल्याच ट्रोल झाल्या आहेत.
देशात लसीकरण मोहिम ही जानेवारी महिन्यात सुरू झाली. सुरूवातीच्या काळात कोरोना योद्धे, फ्रंटलाईन वर्कर्स, आरोग्य कर्मचारी यांचं लसीकरण करण्यात आलं. एप्रिल महिन्यात 45 वर्षे आणि त्यावरील लोकांचं लसीकरण करण्यास सुरूवात झाली. तर 1 मे पासून 18 वर्षांवरील सगळ्यांना लस दिली जाईल असं सरकारने जाहीर केलं. मात्र लसींचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर भासू लागला. राज्यांना लस खरेदी करण्याचीही मुभा केंद्राने दिली होती. मात्र लसींची निर्मितीच तेवढ्या प्रमाणावर झाली नाही त्यामुळे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांना 18 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण थांबवावं लागलं. आता लसीकरण सुरू आहे मात्र त्याचा वेग मंदावला आहे. अशा सगळ्या परिस्थितीत अमृता फडणवीस यांनी केलेलं ट्विट चांगलंच चर्चेत आहे आणि ट्विटरवर त्यांना ट्रोलही केलं जातं आहे.
ADVERTISEMENT