महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक महत्त्वाची घोषणा ट्विटरवर केली आहे. अमृता फडणवीस या नवं गाणं म्हणणार आहेत. त्या बँकिंग क्षेत्रातही कार्यरत आहेत तसंच गायिका आहेत. त्यांची गाणी सोशल मीडियावर आणि युट्यूबवर व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वीच अमृता फडणवीस यांनी एक प्रश्न विचारला होता त्याचे तीन पर्याय होते त्यात नवं गाणं म्हणणार आहे हा देखील होता. आता अमृता फडणवीस यांनी नव्या गाण्याची घोषणा केली आहे.
ADVERTISEMENT
सुप्रसिद्ध गायक शान अर्थात शांतनू मुखर्जीसोबत रोमँटिंक साँग गाणार आहेत अशी माहिती अमृता फडणवीस यांनी ट्विट करून दिली आहे. अमृता फडणवीस यांनी एका चित्रपटासाठी हे गाणं गायलं आहे. त्या सिनेमाचं नावही त्यांनी जाहीर केलं आहे. पंडित ललित यांचं संगीत, संजय चेल यांनी गीतं आणि पटकथा लिहिलेला हा सिनेमा ऑगस्ट महिन्यात रिलिज होणार असल्याचीही माहिती अमृता फडणवीस यांनी दिली आहे.
लव्ह यू लोकतंत्र या सिनेमासाठी अमृता फडणवीस यांनी शानसोबत गाणं म्हटलं आहे. हे गाणं विनोदी राजकीय भाष्य करणाऱ्या लव्ह यू लोकतंत्र मधलं आहे. हा सिनेमा ऑगस्ट २०२२ मध्ये रिलिज होणार आहे असंही अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
६ जूनला तीन पर्याय देत अमृता फडणवीस यांनी केलेलं ट्विट काय होतं?
रिक्त स्थान भरे… आज मै……………………… असं म्हणत रिकामी ओळ सोडली आहे आणि तीन पर्याय दिले आहेत
१) corona positive पाई गयी हूं
२) एक दुख भरा प्रेमगीत लिख रही हूं
३) बरसातसे पहले #mumbai की सडकोंका मुआईना करने का प्लान रही हूँ सही जवाब चुनने वालोको मिलेगा Like असं म्हणत त्यांनी ही पोस्ट केली आहे.
या पोस्टनंतर अमृता फडणवीस यांना बऱ्याच जणांनी ट्रोल केलं होतं. तुम्ही गाऊ नका असंही बरेच जण म्हणाले होते. तर काहींनी अमृता फडणवीस यांना कोरोना झाल्याचं म्हटलं होतं.
अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये सिनेमाच्या टीमसोबतचे फोटोही शेअर केले आहेत. यामध्ये गायक शानही दिसतो आहे. शानसोबत मी गाणं म्हणणार आहे असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. हा सिनेमा लव्ह यू लोकतंत्र नावाचा आहे. हा सिनेमा ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार आहे.
ADVERTISEMENT