Pune: आधी अपहरण नंतर हत्या, 8 वर्षांच्या आदित्यच्या खूनामागचं कारण काय?

मुंबई तक

10 Sep 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:10 AM)

समीर शेख, प्रतिनिधी पुणे: पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 8 वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती, त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासादरम्यान दोन संशयितांना ताब्यात घेतले. पोलीस चौकशीदरम्यान जी माहिती समोर आली त्यातून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. ज्या चिमुकल्याचं अपहरण करण्यात आलं […]

Mumbaitak
follow google news

समीर शेख, प्रतिनिधी

हे वाचलं का?

पुणे: पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 8 वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती, त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासादरम्यान दोन संशयितांना ताब्यात घेतले. पोलीस चौकशीदरम्यान जी माहिती समोर आली त्यातून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. ज्या चिमुकल्याचं अपहरण करण्यात आलं होतं त्याची हत्या केल्याची कबुली त्या दोन संशयीतांनी दिली आहे. त्यानंतर त्यांना खूनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

अपहरणकर्त्याने मागितली २० कोटींची खंडणी

मिळालेल्या माहितीनुसार, 8 सप्टेंबर रोजी पिंपरीतील ग्रीनफिल्ड सोसायटीत राहणारा 8 वर्षीय आदित्य गजानन ओगले याच्या वडिलांनी पिंपरी पोलीस ठाण्यात आपला मुलगा गायब असल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने चौकशीला सुरुवात केली. मुलाचा शोध घेत असतानाच मुलाच्या आईच्या मोबाईलवरती एक फोन आला, ज्यावरती अपहरण केलेल्या आरोपींनी मुलाच्या जिवाच्या बदल्यात २० कोटींची खंडणी मागितली.

तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी काल रात्री मंथन भोसले आणि अनिकेत समुद्रे नावाच्या दोघांना ताब्यात घेतले आणि त्यांची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान त्यांनी कबुली दिली की आदित्यचे अपहरण आणि हत्या त्यांनीच घडवून आणली आहे. भोसरी एमआयडीसी परिसरात असलेल्या निर्जन इमारतीच्या छतावर त्यांनी आदित्यचा मृतदेह प्लास्टिकच्या गोणीत भरुन टाकला होता, त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेहाची ओळख पटवून बॉडी पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवली.

हत्या कशासाठी केली याचं कारण अद्याप अस्पष्ट

सध्या या प्रकरणाबाबत पोलिसांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांकडून खून का केला याची माहिती मिळालेली नाहीये. चिमुकल्याची हत्या करण्यामागचे मुळ कारण काय हे लवकरत तपासातून समोर येईल असं सांगण्यात आले आहे. जसा तपास पूर्ण होईल याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवली जाईल असं पोलिसांनी सांगितले आहे.

    follow whatsapp