ADVERTISEMENT
आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांच्या मृत्यू प्रकरणात त्यांचे शिष्य आनंद गिरी यांना अटक झाली आहे. मात्र वाद आणि त्यांचं नातं आत्ताचं नाही तर जुनंच आहे
आनंद गिरी उर्फ अशोक चोटिया राजस्थानच्या भीलवाडा जिल्ह्यातील ब्राह्मणो की सरेरी गावाचे आहेत. या ठिकाणी त्यांचं लहानपण गेलं
लहानपणी त्यांनी गाव सोडून हरिद्वार गाठलं. हरिद्वारमध्येच नरेंद्र गिरी आणि त्यांची भेट झाली होती. नरेंद्र गिरी यांनी त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली होती.
प्रयागराज येथील मोठ्या हनुमान मंदिरात त्यांना छोटे महाराज म्हणून ओळखलं जाई. नरेंद्र गिरी आणि त्यांच्यात संपत्तीवरून अनेकदा वाद झाले
लक्झरी कार आणि बाईक यांच्यासह आनंदगिरींचे फोटो व्हायरल झाले आहेत त्यांच्यावर याप्रकरणी खूप टीकाही झाली आहे.
2019 मध्ये आनंद गिरी यांना सिडनी पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्यावर दोन महिलांसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप होता. नंतर ऑस्ट्रेलिया न्यायलयाने त्यांची मुक्तता केली.
आनंद गिरी यांच्यावर संन्यास घेतल्यानंतर कुटुंबीयांशी संबंध ठेवल्याचेही आरोप झाले. तसं करणं संन्यास घेतल्यानंतर अनुचित मानलं जातं
आनंद गिरी महाराज हे आत्तापर्यंत वादाच्या भोवऱ्यात अनेकदा अडकले आहेत
ADVERTISEMENT