Andheri By Poll : विजयानंतर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या..

मुंबई तक

06 Nov 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:38 AM)

अत्यंत चर्चेत राहिलेल्या अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नेत्या ऋतुजा लटके विजयी झाल्या आहेत. रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व ही विधानसभेची जागा रिक्त झाली होती. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी तिकीट दिलं होतं. त्यााधी झालेलं सत्तांतर आणि शिवसेनेत पडलेली फूट आणि वेगळं चिन्ह, तसंच नाव मिळणं […]

Mumbaitak
follow google news

अत्यंत चर्चेत राहिलेल्या अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नेत्या ऋतुजा लटके विजयी झाल्या आहेत. रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व ही विधानसभेची जागा रिक्त झाली होती. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी तिकीट दिलं होतं. त्यााधी झालेलं सत्तांतर आणि शिवसेनेत पडलेली फूट आणि वेगळं चिन्ह, तसंच नाव मिळणं हे महाराष्ट्राने पाहिलं आहे. आज ऋतुजा लटके विजयी झाल्या आहेत. त्यांनी यानंतर माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे ऋतुजा लटके यांनी?

आज या निवडणुकीत जो विजय झाला तो माझा नसून माझे पती रमेश लटके यांचा विजय आहे असं मी मानते. रमेश लटके यांनी हयात असताना जी जनसेवा केली, लोकांची कामं मार्गी लावली त्यामुळेच त्याचंच रूपांतर हे आजच्या विजयात झालं आहे असं मी मानते. मतदारांनी त्याचीच परफेड केली आहे असं मला वाटतं.

भाजपने उमेदवारी मागे घेतली पण नोटा निवडा हे सांगण्यात येत होतं. त्याच्या क्लिप्सही आल्या होत्या. मतदारांनी बऱ्याच प्रमाणात नोटावर मतदान केलं आहे. ते का? याचं कारण हे लोकांना, मतदारांनाच विचारलं पाहिजे असं लटके यांनी म्हटलं आहे.

मातोश्रीवर जाऊन आशीर्वाद घेणार

मी सगळ्या मतदारांचे आभार मानते. लोकांची मला साथ आहे त्यामुळेच मी निवडून आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने मी निवडून आले त्यांचे मी आभार मानते असंही ऋतुजा लटके यांनी म्हटलं आहे. मी आता मातोश्रीवर जाणार आहे. महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची मी आभारी आहे असंही ऋतुजा लटके यांनी म्हटलं आहे. ही निवडणूक माझ्या पतीच्या जाण्यानंतर मला लढवावी लागली याची मला खंत वाटते आहे असंही म्हणत ऋतुजा लटकेंनी त्यांच्या भावना बोलून दाखवल्या. आपल्याला संघर्ष करावा लागला. पक्षाला नवं नाव आणि चिन्ह मिळालं तरीही आपण ही निवडणूक जिंकली याचं समाधान आहे असंही ऋतुजा लटके यांनी म्हटलं आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक निकाल : 19वी फेरी

ऋतुजा लटके – 66,247

बाळा नाडार – 1,506

मनोज नाईक – 888

मीना खेडेकर – 1,511

फरहान सय्यद – 1,087

मिलिंद कांबळे – 614

राजेश त्रिपाठी – 1,569

नोटा – 12,776

एकुण मतदान – 86,198

    follow whatsapp