योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर
ADVERTISEMENT
नागपूर जिल्ह्यातल्या रामेटकमध्ये असलेल्या बनपुरी गावात घरगुती वादातून आलेल्या रागातून महिलेने बाळाला विष पाजलं आणि स्वतःही विष प्यायली. या घटनेत लहान बाळाचा मृत्यू झाला आहे. 14 जानेवारीला ही घटना घडली आहे. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. महिलेची प्रकृती गंभीर आहे तिला रामटेक येथील योगीराज रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
ठाणे : आईने पाच महिन्याच्या बाळाला पाण्याच्या ड्रममध्ये टाकलं, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
महिलेचं नाव प्रणाली रामकृष्ण धावडे असं आहे. ती 22 वर्षांची आहे, तिने तिच्या 17 महिन्यांच्या बाळाला विष पाजलं. त्यानंतर स्वतःही विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या बाळाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं आहे. या घटनेमुळे बनपुरी गावावर शोककळा पसरली आहे. या सगळ्या सून्न करणाऱ्या वातावरणातच बाळाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पुणे : ‘लिव्ह इन’मध्ये असताना झाला बाप, 13 दिवसांच्या बाळाला संपवलं; अडीच वर्षांनी फुटलं बिंग
प्रणाली धावडे या महिलेवर योगीराज राधाकृष्ण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती गंभीर असली तरीही जिवाचा धोका टळला आहे. प्रणालीचा तिच्या सासरच्या मंडळीशी वाद झाला. त्यानंतर प्रणालीचा पती, सासू, दिर आणि सासरे हे सगळे शेतावर गेले होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास प्रणालीने बाळाला विष पाजलं आणि त्यानंतर ती स्वतःही विष प्यायली. संध्याकाळी पाच वाजता प्रणालीचा पती आणिसासू हे दोघे घरी आले. त्यांनी लहान बाळाला प्रणालीला हाक मारली. मात्र कुणीही समोर आलं नाही. त्यावेळी लहान बाळ विष प्यायल्याने दगावलं होतं. प्रणालीची प्रकृती गंभीर होती त्यामुळे तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकरणी रामटेक पोलीस ठाण्याचे अधिकारी प्रमोद मकेश्वर पुढील तपास करत आहेत.
ADVERTISEMENT