ADVERTISEMENT
एकेकाळी यशाच्या शिखरावर असलेल्या अनिल अंबानींच्या कंपन्यांवर दिवाळखोरीची कार्यवाही सुरू आहे.
मुकेश आणि अनिल अंबानी यांना रिलायन्स उद्योगाचा वारसा ज्येष्ठ उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्याकडून मिळाला.
मात्र, नंतर मालमत्तेच्या विभाजनावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर आई कोकिला बेन यांनी व्यवसायाची विभागणी केली.
मुकेश अंबानींना जुना पेट्रोकेमिकल व्यवसाय मिळाला, तर अनिल अंबानींना नवीन काळातील दूरसंचार, वित्तीय सेवा आणि ऊर्जा व्यवसाय मिळाला.
अनिल अंबानी नवीन युगाच्या व्यवसायात काही नवं करू शकले नाहीत, तर दुसरीकडे मुकेश अंबानींनी मोठी उंची गाठली.
अनिल अंबानी यांची दूरसंचार व्यवसायाबाबत अतिशय महत्त्वाकांक्षी योजना होती.
अनिल अंबानींना दूरसंचार, उर्जा आणि पायाभूत सुविधांमध्ये देशात सर्वात मोठं नाव कमवायचं होतं.
संस्थात्मक गुंतवणूकदार सल्लागार सेवाचे एमडी, अमित टंडन, अनिल अंबानींच्या व्यवसायात आलेल्या घसरणीबाबत बरंच काही सांगतात.
अमित टंडन सांगतात, ‘एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायात उडी घेतल्याने अनेक प्रकल्पांवर खूप पैसा खर्च झाला. नव्या प्रकल्पात पैसे गुंतवल्याने कर्ज वाढले.
2008 मध्ये, अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुप (ADAG) कंपन्यांचे बाजार मूल्य सुमारे 4 लाख कोटी रुपयांवर पोहोचले होते.
पण, 2019 मध्ये ते 2,361 कोटी रुपयांवर घसरले. सध्या अनिल अंबानींच्या अनेक कंपन्यांवर बँकांच्या मोठ्या कर्जाचा बोजा आहे.
ADVERTISEMENT