परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांनंतर राज्यातील राजकारणात चांगलाच मोठा भूकंप झाला. परमबीर यांच्या आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी अनिल देशमुख यांची पाठराखण करत…फेबुव्रारी महिन्यात अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते नागपुरातील हॉस्पिटलमध्ये असल्याचं सांगितलं. यावेळी बोलत असताना शरद पवार यांनी देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं सांगितलं.
ADVERTISEMENT
दरम्यान शरद पवार यांनी अनिल देशमुखांची पाठराखण केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख यांचा १५ फेब्रुवारीचा पत्रकार परिषदेतला एक व्हिडीओ पोस्ट करुन, कोरोना झालेला असतानाही सुरक्षारक्षकांसह पत्रकार परिषद घेणारे हे नेमके कोण? असा उपरोधिक सवाल विचारला…
भाजपने हा आरोप केल्यानंतर अनिल देशमुख यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्या कार्यालयातून एका व्हिडीओ मेसेजद्वारे अनिल देशमुख यांनी भाजपच्या आरोपांना उत्तर दिलंय. “मला कोरोनाची लागण झाल्यामुळे मी नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये ५ ते १५ फेब्रुवारीपर्यंत दाखल होतो. १५ फेब्रुवारीला मला डिस्चार्ज मिळाला, यावेळी हॉस्पिटलमधून बाहेर पडत असताना गेटवर काही पत्रकार उभे होते. त्यांना मला काही प्रश्न विचारायचे होते. पण त्यावेळी माझ्या अंगात त्राण नव्हते, म्हणून मी तिकडेच एक खुर्ची घेऊन बसलो त्यांच्या प्रश्नांनी उत्तरं दिली आणि मग घरी गेलो. यानंतर १५ ते २७ फेब्रुवारीपर्यंत मी होम क्वारंटाइन होतो. २८ फेब्रुवारीला पहिल्यांदा मी बैठकीसाठी सह्याद्री गेस्ट हाऊसवर आलो.”
दरम्यान, ‘मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना माफीचा साक्षीदार करायचं ठरवलं आहे. त्यामुळेच त्यांनी गृहमंत्र्यांवर खोटे आरोप केले आहेत. त्यांनी लिहलेल्या पत्रामागे खूप मोठं कारस्थान आहे’, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी परमबीर सिंग यांच्यासह भाजपवर देखील टीका केली आहे.
अँटेलिया प्रकरणाचे हादरे गृहमंत्र्यांपर्यंत, कसे अडकत गेले अनिल देशमुख?; पाहा सविस्तर रिपोर्ट
ADVERTISEMENT