सुपर मार्केटमधील वाईन विक्रीविरोधातील आंदोलन मागे; अण्णा हजारे म्हणाले…

मुंबई तक

• 09:39 AM • 13 Feb 2022

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरुद्ध समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणास्त्र उपसले होते. मात्र, राज्य सरकारकडून आंदोलन न करण्याची विनंती करण्यात आल्यानंतर अण्णा हजारेंनी उपोषण न करण्याचा निर्णय घेतला आहे. राळेगणसिद्धी येथे झालेल्या ग्रामसभेत अण्णा हजारेंनी उपोषण न करण्याबद्दल भूमिका स्पष्ट केली. सुपर मार्केटमधून वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात ज्येष्ठ […]

Mumbaitak
follow google news

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरुद्ध समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणास्त्र उपसले होते. मात्र, राज्य सरकारकडून आंदोलन न करण्याची विनंती करण्यात आल्यानंतर अण्णा हजारेंनी उपोषण न करण्याचा निर्णय घेतला आहे. राळेगणसिद्धी येथे झालेल्या ग्रामसभेत अण्णा हजारेंनी उपोषण न करण्याबद्दल भूमिका स्पष्ट केली.

हे वाचलं का?

सुपर मार्केटमधून वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी १४ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला होता. मात्र सरकारने हजारे यांनी उपोषण न करण्याची विनंती केली. त्यानंतर आज (13 फेब्रुवारी) राळेगणसिद्धी येथे ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या ग्रामसभेत अण्णा हजारे यांनी नियोजित उपोषण स्थगित करत असल्याचं जाहीर केलं.

सरकारने ९० दिवसांत या निर्णयावर जनतेचे मत जाऊन घ्यावे आणि त्यांनतर अंतिम निर्णय घ्यावा, असा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर उपोषण न करण्याबाबत अण्णा हजारे यांना विनंती करण्यात आली. त्यानुसार हजारे यांनी उद्यापासून करण्यात येणारे उपोषण स्थगित केलं आहे. या वयात अण्णांनी आता उपोषण करू नये, असं आवाहन अरुण भालेकर यांनी केलं.

“तुमच्या राज्यात मला जगायची इच्छा नाही, असं मी सरकारला कळवलं होतं आणि त्यानंतर मग सरकारी पातळीवर हालचाली सुरू झाल्या. जे निर्णय घायचे ते जनतेचं मत विचारात घेऊन घ्यावेत. वाईन संबंधीचा निर्णय जनतेला विचारून घ्यायला हवा. व्यसनामुळे लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. माझे आयुष्य मी समाज आणि देशासाठी दिलं आहे. त्यामुळे अशा चुकीच्या निर्णयांविरुद्ध लढा देत राहणार,” असं अण्णा हजारे यांनी ग्रामसभेत बोलताना सांगितलं.

“या पुढे सरकारने आपल्या मनाने कोणतेही निर्णय घेऊन जनतेवर लादू नयेत, तसं झाले तर ग्रामसभा आंदोलन करतील. केवळ राळेगणसिद्धी नव्हे, राज्यातील सर्व गावात असे निर्णय घ्या. सरकारने यापुढे प्रत्येक ग्रामसभेला विश्वासात घेऊन निर्णय घ्यावेत, असा राळेगणसिद्धी ग्रामसभेचा निर्णय घेण्यात आला. तसंच पुढील तीन महिन्यात वाईनसंबंधी जनमत जाणून घ्या. लोक नको म्हणाले, तर निर्णय रद्द करा,” असंही अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp