Husband Wife Died in Bathroom: भिलवाडा: होळी खेळून एकत्र आंघोळीसाठी गेलेल्या एका दाम्पत्याचा मृत्यू (Death) झाल्याची घटना गाझियाबादमध्ये घडली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा तशीच घटना राजस्थानमधील (Rajasthan) भिलवाडा (Bhilwara) जिल्ह्यातील शाहपुरा येथे घडली आहे. शीतला अष्टमीच्या दिवशी रंग खेळल्यानंतर बाथरूममध्ये एकत्र आंघोळीला गेलेल्या एका पती-पत्नीचा गॅस गिझरमधून (Gas Geyser) बाहेर पडणाऱ्या विषारी वायूमुळे (poisonous gas) गुदमरून एका जोडप्याचा मृत्यू झाला. दुसरीकडे याच विषारी वायूमुळे जोडप्याचा लहान मुलगाही बेशुद्ध पडला. त्याची प्रकृती गंभीर असून त्याला भिलवाडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (another husband wife death together in the bathroom why is this happening)
ADVERTISEMENT
एजन्सी मोहल्ला येथे राहणारे शिवनारायण झंवर (वय 37 वर्ष) आणि त्यांची पत्नी कविता झंवर (वय 35 वर्ष) हे चार वर्षांच्या निरागस चिमुकल्या विहानसोबत रंग खेळल्यानंतर बाथरूममध्ये अंघोळीसाठी गेले होते.
जवजवळ एक तास उलटून गेला तरीही तिघे बाहेर न आल्याने नातेवाईकांनी त्यांना आवाज दिला. पण बाथरूममधून काहीही आवाज न आल्याने नातेवाईकांनी बाथरूमचा दरवाजा तोडला. त्यावेळी पती-पत्नी आणि मुलगा हे बाथरूममध्ये बेशुद्धावस्थेत पडले होते आणि गॅस गिझर चालू होता. यावेळी नातेवाईकांनी घाईघाईत तिघांनाही तात्काळ रुग्णालयात नेलं. त्यावेळी डॉक्टरांनी दाम्पत्याला मृत घोषित केलं.
अपघातातील बालक विहानची प्रकृती गंभीर असल्याने त्याला भिलवाडा येथील रुग्णालयात पाठविण्यात आलं. या घटनेची माहिती मिळताच स्टेशन प्रभारी राजकुमार नायक पोलीस पथकासह रुग्णालयात पोहोचले. या घटनेबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, ‘बाथरूममधील गिझरमधून विषारी वायू बाहेर पडल्याने या जोडप्याचा गुदमरून मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतरच नेमकी माहिती समोर येईल.’
आंघोळीसाठी बाथरुममध्ये गेलेल्या नवरा-बायकोचा एकाच वेळी मृत्यू, काय घडलं?
गाझियाबादमध्ये पती-पत्नीचा बाथरूममध्ये मृत्यू झाला
नुकतंच गाझियाबादच्या मुरादनगर पोलीस स्टेशन हद्दीतील मुख्य रस्त्यावर असलेल्या अग्रसेन मार्केट परिसरात होळीच्या दिवशी बाथरूममध्ये आंघोळ करताना गॅस गिझरमधील विषारी वायूमुळे पती-पत्नीचा मृत्यू झाला होता. या घटनेतही दरवाजा तोडून दोघांनाही बाथरूममधून बाहेर काढण्यात आले होते. दीपक गोयल (वय 40 वर्ष) पत्नी शिल्पी (वय 35 वर्ष) आणि दोन लहान मुलांसह राहत होते.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, होळी खेळल्यानंतर पती-पत्नी दोघेही दुपारी चारच्या सुमारास बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेले होते. तास उलटून गेला तरी ते बाहेर न आल्याने मुलांनी आवाज केला. त्यावेळी इतर नातेवाईक घरात आले. आतून काहीही आवाज न आल्याने कुटुंबीयांनी दरवाजा तोडून दोघांनाही बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढले. त्यावेळीही गॅस गिझर चालू असल्याचे दिसून आले. बाथरूममध्ये खेळती हवा राहावी यासाठी जागा नव्हती. यावेळी कुटुंबीयांनी घाईघाईने पती-पत्नी दोघांनाही गाझियाबाद येथील रुग्णालयात दाखल केले. जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
Air India च्या महिला वैमानिकाचा नाशिकमधे गॅस गिझरमुळे दुर्दैवी मृत्यू, गेल्या 10 दिवसातील दुसरी घटना
गॅस गिझर जीव कसा घेतो?
तज्ज्ञांच्या मते, गॅस गिझरमधून कार्बन मोनोऑक्साइड वायू बाहेर पडतो. जो बाथरूममध्ये वेंटिलेशन नसल्यामुळे जीवघेणा ठरतो. कार्बन मोनो-ऑक्साइड वायू शरीरात पोहोचतो आणि शरीरातील हिमोग्लोबिनचा रेणू अवरोधित होतो आणि शरीरातील ऑक्सिजनच्या प्रवाहावर परिणाम होतो आणि व्यक्ती बेशुद्ध होते. तसेच शरीरात जास्त प्रमाणात कार्बन मोनो-ऑक्साइड वायू गेल्याने त्याचा मृत्यू होतो.
हा गॅस सायलेंट किलर आहे!
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की कार्बन मोनोऑक्साइडला सायलेंट किलर देखील म्हणतात. याचे एक कारण म्हणजे तुम्हाला त्याचा वास येत नाही, तो डोळ्यांना दिसतही किंवा त्याची चवही जाणवत नाही. तसेच त्याची कधी गळती होते हे देखील समजत नाही. हा गॅस गिझर, कारच्या एसी किंवा घरातील एसीमधून बाहेर पडतो. हा वायू शांतपणे मानवी श्वासात प्रवेश करतो. वायू शरीरात प्रवेश करताच व्यक्तीला अंमल चढतो आणि काही क्षणात तो बेशुद्धावस्थेत जातो आणि बेशुद्धावस्थेतच त्याचा मृत्यू होतो.
नाशिक: पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या, ‘या’ कारणामुळे उचललं टोकाचं पाऊल
ADVERTISEMENT