बॉलिवूड सिंगर अरिजीत सिंग याच्या आईचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना कोलकातामधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात केलं होतं. त्या काही दिवसांपासून ECMO वर होत्या आणि त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर गुरुवारी सकाळी 11 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ADVERTISEMENT
अरिजितच्या आईला रूग्णालयात दाखल केल्याच्या बातमीला अभिनेत्री स्वस्तिकाने दुजोरा दिला होता. तिने सोशल मीडियावर पोस्ट केली होती. स्वस्तिकाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, अरिजीत सिंगच्या आईसाठी A- रक्ताची गरज आहे. शिवाय यानंतर चित्रपट निर्माते श्रीजित मुखर्जी यांनीही लोकांना विनंती केली. त्यांनी बंगालीमध्ये ट्विट करुन अरिजित सिंगच्या आईसाठी मदत मागितली होती.
अरिजित सिंगच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्याने 2005 पासून आपल्या करिअरला सुरुवात केली. त्याने फेम गुरुकुल या सिंगिंग रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. मात्र, यामधून त्याला अधिक प्रसिद्धी मिळाली नाही. अरिजितने आपल्या करियरमध्ये खूप स्ट्रगल केला आहे. आशिकी 2 या सिनेमाच्या ‘तुम ही हो’ या गाण्यापासून तो नावारूपाला आला. सध्या अरिजीत बॉलिवूडमधील रोमँटिक गाण्यांसाठी ओळखला जातो.
त्याने एकापेक्षा एक जबरदस्त गाणी गायली आहेत. कबीरा, सुनो ना संगमरमर, मस्त मगन, हमदर्द अशी अनेक त्याची उत्तम गाणी आहेत. अरिजित बंगालीमध्येही गाणी गातो. अरिजितने टीव्ही शो मधुबालाचं शीर्षकगीतही गायले. शिवाय अरिजित सिंगला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.
ADVERTISEMENT