लष्कर म्हणजे दुकान किंवा कंपनी नाही; अग्निपथ योजनेला विरोध करणाऱ्यांवर व्ही.के. सिंग यांची टीका

मुंबई तक

• 07:45 AM • 20 Jun 2022

–योगेश पांडे, नागपूर लष्कारातील भरतीसाठी लागू करण्यात आलेल्या अल्पकाळीन अग्रिपथ योजनेला (Agnipath scheme) तीव्र विरोध होत आहे. या योजनेच्या आडून काँग्रेस आणि विरोधक तरुणांची माथी भडकावण्याचं काम करत आहेत. लष्कारातील नोकरी हे रोजगाराचं साधन नाही, असं म्हणत माजी लष्करप्रमुख आणि केंद्रीय राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांनी विरोधकांवर निशाणा साधला. नागपूर येथे माध्यमांशी बोलताना व्ही.के. सिंग म्हणाले, […]

Mumbaitak
follow google news

योगेश पांडे, नागपूर

हे वाचलं का?

लष्कारातील भरतीसाठी लागू करण्यात आलेल्या अल्पकाळीन अग्रिपथ योजनेला (Agnipath scheme) तीव्र विरोध होत आहे. या योजनेच्या आडून काँग्रेस आणि विरोधक तरुणांची माथी भडकावण्याचं काम करत आहेत. लष्कारातील नोकरी हे रोजगाराचं साधन नाही, असं म्हणत माजी लष्करप्रमुख आणि केंद्रीय राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

नागपूर येथे माध्यमांशी बोलताना व्ही.के. सिंग म्हणाले, “कारगिल युद्धापसून अग्निपथ योजनेवर (Agnipath Scheme) चर्चा सुरू आहे. त्यावेळी समिती निर्माण करण्यात आली होती. तेव्हापासून त्यापासूनच यावर काम सुरू आहे. अल्पकाळावधीसाठी सैनिक आले, तर हे फायद्याचेच आहे. अनेक वर्षांपासून मागणी होतेय की नागरिकांना लष्करी प्रशिक्षण मिळावं. ती सध्या होणार आहे.”

“यात काही लोक हे अल्पकालावधीसाठी आले, तर ७५ टक्के लोकांसाठी इतर पर्याय खुले होणार आहे. जर का २५ टक्के लोकांमध्ये सेवेसाठी कर्तृत्व दिसून आलं तर त्यांचा कार्यकाळ पुढे वाढवून दिला जाणार आहे. चार वर्षे लष्कारात सेवा दिल्यानंतर त्याची मानसिकता कुणालाही मदत करण्याची असते. परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी तो सक्षम असतो. त्याची मानसिकता वेगळी असते, असं मला वाटतं,” असं माजी लष्करप्रमुख आणि केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग म्हणाले.

“लष्कर हे काही रोजगाराचं साधन नाही. दुकान नाही की कंपनी नाही. यात लोक हे स्वेच्छेनं देशासाठी प्राण देण्याची शपथ घेऊन येतात. काहींना वाटतं तेव्हा ते सोडूनही जातात. अनेकजण पेन्शन न घेताच नोकरी सोडून गेले आहेत. यासाठी रोजगार हा शब्द का वापरत हेच मला कळत नाही,” असेही व्ही. के. सिंग म्हणाले.

व्ही.के. सिंग अग्रिपथ योजनेवरून विरोधकांवर भडकले

“युवकांना भ्रमित करण्याचं काम काँग्रेस या माध्यमातून करत आहे. अत्यंत खालच्या दर्जाचे हे काम विरोधक करत आहेत. या आंदोलनात सहभागी होणाऱ्या तरुणांना हे माहितीच नाही की, ते आंदोलनात कशासाठी आले आहेत. त्या तरुणांची माथी भडकावण्याचे काम विरोधक करत आहेत.”

“विरोधकांचं एकच काम आहे की सरकारची कितीही चांगली योजना असली तरी त्याला रोखण्याचं काम ते करतात. सरकारला बदनाम करून दंगे भडकावण्याचं काम काँग्रेस करत आहे. आम्ही सेवानिवृत्त झालो. जर कोणी आम्हाला मार्गदर्शन मागितलं तर आम्ही करू. आता लष्करात असलेल्यांनी काम करण्याची गरज आहे, आम्ही फक्त मार्गदर्शन करण्याचे काम करू शकतो,” असं व्ही.के. सिंग म्हणाले.

    follow whatsapp