अमृतसर: पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर पंजाब पोलीस आता अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. पंजाब पोलिसांनी उत्तराखंडमधून 6 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, सिद्धू मुसेवाला यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टमही पूर्ण झाले आहे. पाच डॉक्टरांच्या समितीने सिद्धू मुसेवाला यांचे पोस्टमॉर्टम पूर्ण केले आहे.
ADVERTISEMENT
मुसेवाला यांच्या शरीरावर सुमारे दोन डझन गोळ्यांच्या जखमा असल्याचे सांगण्यात येत आहे. रिपोर्टनुसार, अतिरक्तस्रावामुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर या गोळीबारात मुसेवालाच्या अंतर्गत अवयवांनाही जखमा झाल्याचे आढळून आलं आहे. याशिवाय डोक्यात एक गोळी सापडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हिसेराचे नमुने पुढील तपासासाठी पाठवण्यात आले आहेत. त्याच वेळी, पोस्टमॉर्टमचे सर्व रिपोर्ट अद्याप तरी पोलिसांना देण्यात आलेले नाहीत. दुसरीकडे, सर्व संशयितांची ओळख पटल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्या सर्वांना लवकरच अटक करण्यात येईल. असं म्हटलं आहे.
पोलिसांकडून सीसीटीव्ही तपासणी
सिद्धू मुसेवाला खून प्रकरणाचा तपास करत असलेले पोलीस सोमवारी मानसातील कांचिया भागातील मनसुख वैष्णो ढाब्यावर पोहोचले. ढाब्यावर लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा स्कॅन करण्यात आला. 29 मे रोजी सीसीटीव्हीमध्ये काही मुले ढाब्यावर जेवण करताना दिसली, पंजाब पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.
हल्लेखोर जेवणासाठी या ढाब्यावर थांबले असल्याचा संशय पोलिसांना आहे. सीसीटीव्हीत दिसणारी ही मुले खरोखरच हल्लेखोर आहेत का, त्यांचा या हत्येत सहभाग आहे की नाही, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
“मुझे गलत मत समझो…” सिद्धू मुसेवालाची अखेरची पोस्ट चर्चेत
लॉरेन्स बिश्नोईची चौकशी
दरम्यान, सिद्धू मूसवाला यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने सोमवारी याप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईची चौकशी केली असून त्याच्या बॅरेक्सचीही झडती घेतली आहे. मात्र, झडतीदरम्यान पोलिसांना लॉरेन्सच्या बॅरेकमधून काहीही सापडलेलं नाही.
ADVERTISEMENT