‘…तर मोदी कुठल्या गल्लीत पडलेत, हे कळलं नसतं कुणाला?’ अरविंद सावंतांनी केला सवाल

मुंबई तक

• 03:31 AM • 19 Sep 2022

शिवसेना फुटली, त्यामागे भाजप असल्याचा आरोप होतोय. त्यावरून आता पुन्हा एकदा शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव घेत थेट भाजपवर हल्ला चढवला. बाळासाहेब ठाकरे आणि लालकृष्ण आडवाणी यांच्यातील बैठकीची आठवण सांगत, त्या उपकाराची अशी परतफेड करता आहात का? थेट सवाल सावंतांनी मोदींना केलाय. अकोला येथे शिवसेनेचा मेळावा झाला. या मेळाव्यात शिवसेना नेते […]

Mumbaitak
follow google news

शिवसेना फुटली, त्यामागे भाजप असल्याचा आरोप होतोय. त्यावरून आता पुन्हा एकदा शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव घेत थेट भाजपवर हल्ला चढवला. बाळासाहेब ठाकरे आणि लालकृष्ण आडवाणी यांच्यातील बैठकीची आठवण सांगत, त्या उपकाराची अशी परतफेड करता आहात का? थेट सवाल सावंतांनी मोदींना केलाय.

हे वाचलं का?

अकोला येथे शिवसेनेचा मेळावा झाला. या मेळाव्यात शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी थेट मोदींना लक्ष्य केलं. इतकंच नाही, तर अरविंद सावंतांनी एकनाथ शिंदेंनाही खडेबोल सुनावलेत.

बाळासाहेब ठाकरे आणि लालकृष्ण आडवाणींची बैठक

‘मुंबईच्या महापौर बंगल्यावर साहेबांनी (शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे) आडवाणीजींसोबत बैठक बोलावली. त्या बैठकीत साहेब बसले आणि आडवाणी साहेब बसले. त्यांनी सांगितलं की, बाळासाहेबजी, एक गंभीर समस्या आहे. आम्ही ठरवलं आहे की, मोदींना हटवायचं आहे. आठवतं का? अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते की, राजधर्माचं पालन. त्या पार्श्वभूमीवर मोदींना हटवायचं आहे. त्यावर बाळासाहेब म्हणाले होते की, काय म्हणता? मोदींना हटवणार? मोदी गेले, तर गुजरात गेला, असं शिवसेनाप्रमुखांचं वाक्य आहे. त्या विधानानंतर आडवाणींनी वाजपेयींना फोन करून सांगितलं की, मोदींना हटवू नका’, असं अरविंद सावंत शिवसैनिकांच्या मेळाव्यात म्हणाले.

मुख्यमंत्री व्हावं म्हणून उद्धव ठाकरेंवर रश्मी ठाकरे ओरडल्या?; रामदास कदमांनी काय म्हटलंय?

नरेंद्र मोदींना अरविंद सावंतांचा सवाल

‘आज मोदी देशाचे पंतप्रधान दिसताहेत ना. बाळासाहेबांनी वाचवलं नसतं ना, तर मोदी आज कुठल्या गल्लीत पडलेत, हे कळलं नसतं कुणाला. त्या उपकाराची फेड तुम्ही अशी करता आहात?’, असं विधान अरविंद सावंत यांनी केलं.

उद्धवजींना म्हणालो, हे करू नका बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती लाभणार नाही -रामदास कदम

बाळासाहेबांचा नाथ होता, स्वतःहून अनाथ झालास; शिंदेंवर सावंतांची तोफ

‘तो सुशांतसिंग कोण? कुठला हिरो. चरित्र नाही. चारित्र्य नाही, असली माणसं ही. त्याची पोस्टर्स काढली. न भुलेंगे, न भुलने देंगे. आदित्य ठाकरेंना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरेंना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. इतक्या खालच्या थराला गेलेत. हे दळभद्री आमचं, अनाथ. एकनाथ होता. बाळासाहेब ठाकरेंचा नाथ होता, तू स्वतःहून अनाथ झालास. तिकडे गेलास. ते तुझी वाट लावताहेत. नासवताहेत’, अशी टीका अरविंद सावंतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली.

    follow whatsapp