गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात आर्यन खानला अटक करण्यात आली होती त्या प्रकरणी आता आर्यन खानला क्लिन चीट देण्यात आली आहे. त्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. समीर वानखेडे यांनी या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला आहे. तर सना मलिक यांनी हे सगळं प्रकरण फर्जिवाडा असल्याचं म्हटलं आहे. अशात या प्रकरणी नवाब मलिक यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरूनही ट्विट करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
आर्यन खानला क्लिन चिट, समीर वानखेडे, सना मलिक काय म्हणाले?
काय आहे ट्विट?
“आर्यन खान आणि त्याच्यासोबत इतर पाच लोकांना कॉर्डिलिया ड्रग्ज प्रकरणी क्लिन चिट मिळाली आहे. त्यामुळे आता एनसीबीचे समीर वानखेडे, त्यांची टीम तसंच त्यांची प्रायव्हेट आर्मी यांच्याविरोधात कारवाई होणार का? की गुन्हेगारांना पाठिशी घातलं जाणार?” असे प्रश्न नवाब मलिक यांच्या ट्विटर अकाऊंटवरून उपस्थित करण्यात आले आहेत.
हे प्रकरण ज्यांनी बाहेर काढलं त्या समीर वानखेडेंचं म्हणणं काय?
समीर वानखेडे यांच्यासी जेव्हा मुंबई तकने संवाद साधला तेव्हा त्यांनी याबाबत मला सध्या काहीही बोलायचं नाही हे सांगत फोन ठेवला. मुंबई तकचे प्रतिनिधी दिव्येश सिंह यांचं वाक्य पुरं होवू दिलं नाही.
आर्यन खान ड्रग केस: ‘…तर पुणे कोर्टात जा’, विशेष कोर्टाने NCB चा अर्ज फेटाळला
नवाब मलिक यांची मुलगी सना मलिकने काय म्हटलंय?
फर्जिवाडा बाहेर आला. सत्य लपून राहात नाही. #NawabMalik #Farziwada #Aryankhan असे हॅशटॅगही त्यांनी या वाक्यासोबत ट्विट केले आहेत.
काय आहे प्रकरण?
आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चंट यांच्यासह आठ जणांना 2 ऑक्टोबरला ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आली होती. एनसबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी ही कारवाई केली होती. त्यानंतर या कारवाईवर अनेक प्रश्नही उपस्थित केले गेले. नवाब मलिक यांनी ही संपूर्ण कारवाई म्हणजे एक प्रकारचा बनाव आहे असं सांगितलं.
तसंच या प्रकरणातले साक्षीदार प्रभाकर साईल, के. पी. गोसावी, मिलिंद भानुशाली यांच्याकडून समोर आलेल्या गोष्टी या वेगळंच कथन करत होत्या. प्रभाकर साईलने खंडणीसाठी आर्यन खानला अडकवल्याचा आरोप केला. त्यामुळे खळबळ उडाली होती. दरम्यान 27 ऑक्टोबरला आर्यन खानला जामीन मंजूर कऱण्यात आला. तसंच मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चंट यांनाही जामीन मंजूर करण्यात आला.
ADVERTISEMENT