अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला आज बॉम्बे हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. ड्रग्ज प्रकरणात त्याला एनसीबीने अटक केली होती. त्याला आज जामीन मंजूर झाला आहे. उद्या किंवा परवा त्याची सुटका आर्थर रोड तुरुंगातून होणार आहे. या सगळ्या प्रकरणानंतर आर्यन खानच्या लीगल टीमनेही सत्यमेव जयते म्हटलं आहे. तर मलायका अरोरा ही अभिनेत्री शाहरुखला भेटण्यासाठी मन्नतवर पोहचली आहे. आर्यनला जामीन मंजूर झाल्यानंतर शाहरुखला भेटायला जाणारी ही पहिली अभिनेत्री आहे.
ADVERTISEMENT
आर्यन खानला जेव्हा अटक झाली आणि त्याला तुरुंगात जावं लागलं तेव्हा अभिनेता सलमान खानने त्याची भेट घेतली होती. दोनवेळा सलमान खान मन्नत वर जाऊन शाहरुखला भेटला होता. आज आता आर्यनला जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे शाहरुखच्या लीगल टीमनेही त्याची भेट घेतली आणि सत्यमेव जयते अशी प्रतिक्रिया दिली आहे.
बॉम्बे हायकोर्टाने काही शर्थींसह आर्यन खानला जामीन मंजूर केला आहे. आर्यनला त्याचा पासपोर्ट कोर्टात जमा करावा लागणार आहे. कोर्टाची संमती मिळाल्याशिवाय आणि एनसीबीला सांगितल्याशिवाय आर्यन खानला देश सोडता येणार नाही. एवढंच नाही या प्रकरणातल्या कुठल्याही आरोपीच्या संपर्कात आर्यनला राहता येणार नाही. कोर्टात सुरू असलेल्या कुठल्याही प्रकरणांवर आर्यनला मत देता येणार नाही या अटी कोर्टाने घातल्या आहेत असं आज तकने त्यांच्या वृत्तात म्हटलं आहे.
संजय दत्त, सलमान खान आणि आता आर्यन: कोण आहेत वकील सतीश मानेशिंदे, ज्यांना बॉलिवूडकरांची पसंती?
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अडल्यानंतर त्याला तुरुंगात जावं लागलं. त्यामुळे मन्नतवर गौरी खानचा वाढदिवस, गौरी आणि शाहरुख यांच्या लग्नाचा वाढदिवस या कोणत्याही फॅमिली फंक्शनमध्ये आर्यन खानला सहभागी होता आलं नाही. आता शाहरुखच्या बर्थ डेच्या दिवशी म्हणजेच 2 नोव्हेंबरला आर्यन मन्नतवर असणार आहे.
बॉम्बे हायकोर्टाने आर्यन खानच्या जामिनाचा निर्णय़ दिल्यावर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्यानंतर विविध सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली. आर. माधवनने प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की आज एका वडिलांना आपल्या मुलाबाबत काय वाटत असेल मी समजू शकतो, असं त्याने म्हटलं आहे.
सोनू सुदनेही ट्विट केलं आहे की देवाचे खूप खूप आभार आहेत की आर्यनला जामीन मिळाला. टीव्ही स्टार आमिर अली यानेही स्टार किड आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर देवाचे आभार मानले आहेत.
ADVERTISEMENT