Rave Party : शाहरुख खानचा मुलगा आर्यनची ‘एनसीबी’कडून चौकशी; 8 जणांना अटक

दिव्येश सिंह

• 03:30 AM • 03 Oct 2021

‘एनसीबी’ने क्रूझ जहाजावर सुरू असलेली मोठ्या रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला. रेव्ह पार्टी सुरू झाल्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईत एनसीबीने 8 जणांना अटक केली आहे. यात महिलांचाही समावेश आहे. दरम्यान या कारवाईत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यालाही एनसीबीने ताब्यात घेतलं असून, त्याची चौकशी केली सुरू असल्याची माहिती एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी दिली. मुंबईहून […]

Mumbaitak
follow google news

‘एनसीबी’ने क्रूझ जहाजावर सुरू असलेली मोठ्या रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला. रेव्ह पार्टी सुरू झाल्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईत एनसीबीने 8 जणांना अटक केली आहे. यात महिलांचाही समावेश आहे. दरम्यान या कारवाईत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यालाही एनसीबीने ताब्यात घेतलं असून, त्याची चौकशी केली सुरू असल्याची माहिती एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी दिली.

हे वाचलं का?

मुंबईहून गोव्याला निघालेल्या कॉर्डेलिया क्रूझ लाइनर एम्प्रेस जहाजावर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर एनसीबीच्या (अंमली पदार्थ विरोधी विभाग) पथकाने धाड टाकली. गेल्या काही दिवसांतील एनसीबीची ही मोठी कारवाई मानली जात आहे. एनसीबीने रेव्ह पार्टी सुरू झाल्यानंतर ही कारवाई केली. यावेळी अंमली पदार्थांचं सेवन करताना 8 जणांना अटक करण्यात आली.

एनसीबीने या कारवाईवेळी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानलाही ताब्यात घेतलं. त्याची रेव्ह पार्टी संदर्भात चौकशी केली जात आहे. एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी याबद्दलची अधिक माहिती दिली.

‘रेव्ह पार्टी प्रकरणात 8 जणांना अटक करण्यात आली आहे. रेव्ह पार्टी प्रकरणी आर्यन खान याची चौकशी केली जात आहे. त्याच्याविरुद्ध अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. तसंच अटकही केलेली नाही. याप्रकरणात जहाजाचे मालक आणि पार्टी आयोजित करणाऱ्या कंपनीच्या मालका चौकशीसाठी बोलावण्यात आलेले आहे. याबद्दलची अधिक माहिती दुपारी देण्यात येईल’, असं समीर वानखेडे यांनी सांगितलं.

Rave party : मुंबईजवळ जहाजावरील रेव्ह पार्टी उधळली! बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलाचा समावेश

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझ जहाजावर आयोजित केलेल्या पार्टीत गेस्ट म्हणून आमंत्रित करण्यात आलेलं होतं. त्यासाठी त्याला कोणतंही शुल्क आकारण्यात आलेलं नव्हतं. ही माहिती आर्यन खानने चौकशीत दिली असल्याचं सूत्रांनी सांगितलं. पार्टी आयोजित करणाऱ्यांनी आर्यन खान येणार असल्याचं सांगून इतरांना निमंत्रित केलं होतं अशीही माहिती समोर आली आहे.

    follow whatsapp