राऊतांची पाठ फिरताच शिंदेंनी केला गेम; नाशकात शिवसेनेला पडलं खिंडार

मुंबई तक

16 Dec 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:34 AM)

प्रविण ठाकरे, प्रतिनिधी (नाशिक) Nashik 17 corporators joined the Shinde group: नाशिक: नाशिक (Nashik) शहरात गेल्या 10 दिवसात दोन वेळा दौरा करुन संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाशिक मतदारसंघात आपलं वर्चस्व राहील असा प्रयत्न केला होता. राज्यात सत्तांतर झालं तरी नाशिकमधून खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) सोडता फारसे कुणी शिंदे गटाच्या (Shinde Group) गळाला लागलं […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

प्रविण ठाकरे, प्रतिनिधी (नाशिक)

हे वाचलं का?

Nashik 17 corporators joined the Shinde group: नाशिक: नाशिक (Nashik) शहरात गेल्या 10 दिवसात दोन वेळा दौरा करुन संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाशिक मतदारसंघात आपलं वर्चस्व राहील असा प्रयत्न केला होता. राज्यात सत्तांतर झालं तरी नाशिकमधून खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) सोडता फारसे कुणी शिंदे गटाच्या (Shinde Group) गळाला लागलं नव्हते, मात्र दोन दिवसापासून नाशिकमध्ये लग्नाच्या निमित्ताने का होईना तळ ठोकून असलेले संजय राऊत यांची पाठ फिरताच शिवसेनेचे (Shivsena) (ठाकरे गट) तब्बल 17 माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी “बाळासाहेबांची शिवसेना” अर्थात एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. (as soon as sanjay raut turned back 17 corporators joined shinde group a huge blow to shiv sena)

नाशिकमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या 17 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात आज (16 डिसेंबर) प्रवेश केला आहे. हे सर्वजण काल रात्रीच मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते.

सुरुवातीला शिवसेनेने या वृत्ताचं खंडन केलं होतं. ‘या बातम्या पसरवल्या जात आहे, मागील वेळेस पण संजय राऊत यांच्या दौऱ्याआधी बातम्या आल्या होत्या, पण प्रत्यक्षात त्या फक्त वावड्या ठरल्या होत्या.’ असं ठाकरे गटातील काही पदाधिकारी म्हणत होते. मात्र, आज सकाळी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ‘वर्षा’ बंगल्यावर शिंदे गटात प्रवेश केला.

राज्यपाल, भाजप, काँग्रेस, उद्धव ठाकरे ते शिंदे गट : राज यांनी घेतला ‘ठाकरे’ शैलीत समाचार

यामुळे नाराज नगरसेवक आणि पदाधिकारी यांची मनधरणी करण्यात संजय राऊत आणि शिवसेना नेते हे अपयशी ठरल्याचं पाहायला मिळतंय.

शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी फोडली एकमेकांची डोकी, तुफान हाणामारी

नाशिकमध्ये शिवसेनेला का पडलं खिंडार?

गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू होती की, शिवसेनेतील मातब्बर गट जिल्हा व शहरात नियंत्रण ठेवून आहे. जुने जाणते असले तरी पक्ष फिरून परत आलेत, तर काही गेल्या 10-15 वर्षांपूर्वीच पक्षात आले आणि आता शहरातील पक्ष आपल्या हातात घेत आहेत. ह्या सर्व नेत्यांमध्ये काही माजी महापौर, उपमहापौर, राज्यस्तरीय नेते आहेत. त्यामुळे शिवसेनेला जर महापालिकेत सत्ता मिळाली तर सर्व महत्वाची पदे ह्याच गटाला जातील आणि दुसऱ्या गटाला मात्र फक्त बघ्याची भूमिका घ्यावी लागेल. याच भीतीतून 17 जणांनी शिंदे गटात जाणं पसंत केलं आहे.

एकंदर मातब्बर गटाची ताकद बघता आपले राजकीय करियर घडवण्यावनाच्या दृष्टिने शिंदे गटात जाणं 17 माजी नगरसेवकांना सोयीचं वाटलं. तसेच आगामी महापालिका निवडणुकीत सध्या तरी शिंदे गटात मोठे दावेदार कोणीच नाही आणि संधीही मोठी मिळू शकते. याशिवाय इथे भाजपकडूनही रसद मिळू शकते. त्यामुळेच शिंदे गटात जाणं हे सध्या तरी सोयीस्कर असल्याचं माजी नगरसेवकांना वाटतो आहे.

कोणते नगरसेवक शिंदे गटात गेले?

  • मध्य नाशिकमधून सलग 5 वर्षे माजी विरोधी पक्षनेते राहिलेले अजय बोरस्ते, नाशिकरोड भागातील रमेश धोंगडे, सूर्यकांत लवटे, ज्योती खोले, जयश्री खर्जुल, सुवर्णा मटाले, चंद्रकांत खाडे, सुदाम डोमसे, पंचवटीमधून पूनम मोगरे, तसेच अमोल जाधव आणि संगीता जाधव या माजी नगरसेवकांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला आहे.

  • 30 नगरसेवकांपैकी आतापर्यंत 17 नगरसेवक शिंदे गटात, तर यापूर्वी महानगरप्रमुख प्रवीण तिदमे आणि शाम कुमार साबळे यांनीही शिंदे गटात प्रवेश केला होता.

गेल्या 4 दिवसात शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, नीलम गोऱ्हे दोन-दोन दिवस कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन गेले. तसेच गेल्या 15 दिवसात संजय राऊत हे दुसऱ्यांदा नाशिकला आले होते. त्यांनीही वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या होत्या. मात्र या सगळ्याचा काहीही फायदा झालेला नाही.

कारण नाशिकमध्ये शिवसेनेच्या 30 पैकी 17 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. आता या सगळ्याचा आता महापालिका निवडणुकीतठाकरे गटाला किती नुकसान होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp