महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद विधानावर बोलताना मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आरे ला का रे उत्तर देऊ, असं म्हटलं होतं. सामना अग्रलेखात याच विधानावर बोट ठेवत संजय राऊतांनी भाजपला लक्ष्य केलं. सामना अग्रलेखातून करण्यात आलेल्या टीकेनंतर आशिष शेलार यांनी पलटवार केलाय. शेलार यांनी एका पत्रातून संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना सवाल केले आणि चिमटेही काढलेत.
ADVERTISEMENT
आशिष शेलार पत्रात म्हणतात, “विरोधी पक्षाने नरसिंह होऊन खोके सरकारचा अंत करायला हवा, अशी ‘मर्दानी’ हाक आज सामनाच्या अग्रलेखातून दिली आणि ‘कर्नाटकने आरे केले तर आम्ही का रे करू’ हा महाराष्ट्राने दिलेला इशारा यांनी नेभळट ठरवला… वा रे मर्दा!”
“मूळात विरोधी पक्षाने नरसिंह अवतार धारण करण्यासाठी, या अवताराला बोलावण्यासाठी एका ‘प्रामाणिक’ भक्त प्रल्हादाची गरज असते ना हो कार्यकारी संपादक महोदय…!” असा उपरोधिक टोला शेलार यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
Sanjay Raut : “राज्यपालांची बिस्किटं न खाता विचारा का रे शिवरायांचा अपमान करता?”
शेलार राऊतांना म्हणाले, ‘राम मंदिर आणि राम वर्गणीची खिल्ली उडवली होतीस ना रे मर्दा?’
“तुमच्याकडे नारायण… नारायण जप करणारा भक्त प्रल्हाद आहे का? तुमच्याकडे आता भक्त प्रल्हाद ही नाही, नारायण ही नाही आणि हो, तुमच्यात आता रामच उरलेला नाही. आठवते का? कधी काळी राम मंदिर आणि राम वर्गणीची खिल्ली उडवली होतीस ना रे मर्दा? आता भक्त प्रल्हाद होऊ पाहताय? वा रे मर्दा!”, असं म्हणत आशिष शेलार यांनी सामना अग्रलेखातून करण्यात आलेल्या टीकेवरून पलटवार केलाय.
“कर्नाटक महाराष्ट्र जशास तसे उत्तर देईल… आरेला का रे करेल… हा इशारा तुम्हाला नेभळट वाटतो काय? मग राहुल गांधी आणि त्यांची काँग्रेस स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांना समलैंगिक म्हणते तेव्हा तुम्ही करता तो काय? मर्दानी बाणा असतो काय? वा रे मर्दा!”, असा सवाल शेलारांनी ठाकरे-राऊतांना केलाय.
भगतसिंह कोश्यारी राज्यपाल पदावरून जाणार?; शिंदे गटाच्या भरत गोगावलेंनीच दिले संकेत
तो काय तुमचा मर्दपणा होता का? आशिष शेलारांचा राऊतांना सवाल
“तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांकडे पुरावे मागता, तो काय तुमचा मर्दपणा होता का? प्रभू राम झालाच नाही… भगवत गिता जिहाद शिकवते असे महान जावई शोध लावणाऱ्या काँग्रेससोबत इलूइलू जे तुमचे सुरू आहे, ती मर्दानकी आहे का?”
“अहो महाराष्ट्रातील श्रद्धा वालकर नावाच्या लेकीचे 35 तुकडे केले जातात, तेव्हा जो पक्ष साधी हळहळ सुद्धा व्यक्त करीत नाही ना, त्याला नेभळटपणा म्हणतात… देशाचे तुकडे करायला निघालेल्या पीएफआयवर आमच्या सरकारने बंदी घातल्यानंतर त्याचे साधे समर्थनही न करणे हे नेभळटपणाचे लक्षण नाही का?”, म्हणत शेलारांनी ठाकरे-राऊतांना उलट सवाल केला आहे.
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वातंत्र्य लढ्यात योगदान काय? हा प्रश्न विचारणे म्हणजे तुम्हाला मर्दानकी वाटते काय? वा रे मर्दा..! वंदनीय हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जे अभिवादन करायला तयार नाही, अशा काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत तडजोडीचा संसार हाच सगळ्यात मोठा नेभळटपणा नाही का?”, असा प्रश्न आशिष शेलारांनी केला आहे.
“खोके क्रांतीत अजय आशर यांचा मोठा हातभार”, एकनाथ शिंदेंना विरोधक नागपुरात घेरणार?
शेलारमामांना तुम्ही नेभळट म्हणताय की काय? आशिष शेलार ठाकरे-राऊतांना काय म्हणाले?
“काश्मीरमधून 370 हटवणे, अयोध्येत राम मंदिर बांधणे ही मर्दानी कामं आहेत संपादक महोदय… आम्हाला, होय… होय आम्ही मर्द आहोत… असे होर्डिंग लावावे लागत नाही… भाजपाने करून दाखवलेय… मनगटात ज्यांच्या जोर असतो तेच मर्दानकी करू शकतात. उरला प्रश्न वंदनीय शेलारमामांचा… अहो तुमचे फुसके कर्तृत्व सिद्ध करायला तुम्ही काय करताय? छत्रपती शिवाजी महाराज यांचे निष्ठावंत पराक्रमी मावळे अशी ओळख असलेल्या शेलारमामांना तुम्ही नेभळट म्हणताय की काय?”, असं म्हणत आशिष शेलार यांनी संजय राऊत आणि ठाकरेंना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आहे.
ADVERTISEMENT