नवी दिल्ली: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण मागच्या अनेक दिवसांपासून भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती. गणपतीच्या दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांची भेट झाल्याचीही चर्चा होती. परंतु दोन्ही नेत्यांनी ही भेट नाकारली होती. आज काँग्रेसच्या हल्ला बोल रॅलीला दिल्लीमधून सुरुवात होत आहे. या कार्यक्रमात अशोक चव्हाण मंचावर पहिल्या रांगेत दिसले. त्यामुळे आता तरी चव्हाण भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना ब्रेक लागेल का?.
ADVERTISEMENT
अशोक चव्हाणंसह 7 आमदार भाजपमध्ये जाण्याची होती चर्चा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी आशिष कुलकर्णी यांच्या घरी अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. तेव्हापासून अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार या चर्चांना बळकटी मिळाली. परंतु यावर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, ”मी पुढील आठवड्यात भारत जोडो यात्रेसाठी दिल्लीला जाणार आहे. तसेच भाजपमध्ये जाणार असल्याच्या संपूर्ण चर्चांना कोणतेही अर्थ नाहीत. या चर्चा पूर्णपणे तत्थहिन आहेत.”
काँग्रेसची महागाईवरुन केंद्राला घेरण्याची तयारी
‘हल्ला बोल’ रॅलीच्या माध्यमातून काँग्रेस देशातील महागाईविरोधात एकजुटीने केंद्रावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी ही रॅली 28 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय राजधानीत होणार होती. परंतु, कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे 4 सप्टेंबर रोजी याचं आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. दिल्लीत काँग्रेसच्या ‘हल्ला बोल’ रॅलीनंतर पुन्हा ‘भारत जोडो यात्रा’ सुरू होणार आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 135 दिवसांची ‘भारत जोडो यात्रा’ 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरू होणार आहे.
राहुल गांधी आपल्या भाषणात काय म्हणाले?
काँग्रेस नेते राहुल गांधींनी हल्लाबोल रॅलीला संबोधीत यावर त्यांनी केंद्र सरकारवरती सडकून टीका केली. राहुल म्हणाले ”जो घाबरतो त्याच्यामध्ये द्वेष निर्माण होतो. भारतात द्वेष वाढत आहे. भारतात भीती वाढत आहे. महागाई, बेरोजगारी आणि भविष्याची भीती वाढत आहे. भाजप आणि आरएसएसचे नेते देशाचे विभाजन करून जाणीवपूर्वक देशात भीती निर्माण करत आहेत. ते लोकांना घाबरवतात आणि द्वेष निर्माण करतात.
मोदी सरकारमध्ये फक्त 2 उद्योगपतींना फायदा: राहुल गांधी
मोदी सरकारमध्ये दोनच उद्योगपतींना फायदा झाला आहे. तुमच्या भीतीचा आणि द्वेषाचा फायदा त्यांच्या हातात जात आहे. गेल्या 8 वर्षात इतर कोणालाही लाभ मिळालेला नाही. प्रसारमाध्यमे देशातील जनतेला घाबरवतात. तेल, विमानतळ, मोबाईल हे संपूर्ण क्षेत्र या दोन उद्योगपतींच्या हातात दिले जात आहे.
ADVERTISEMENT