लाइव्ह

Assembly Elections 2023 Exit Poll Live Updates: छत्तीसगड-राजस्थानमध्ये काँग्रेस तर मध्य प्रदेशमध्ये भाजपची सत्ता!

रोहित गोळे

30 Nov 2023 (अपडेटेड: 08 Dec 2023, 06:47 AM)

Assembly Elections 2023 Exit Poll Live Updates: मुंबई: राजस्थान, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि मिझोराममधील या पाच राज्यातील निवडणुकीची धामधूम आता संपली आहे. त्यामुळे आता सर्वांना या पाच राज्यात नेमकं काय घडणार याबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे. सध्या राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात काँग्रेसला बहुमत मिळालं होतं, मात्र ज्योतिरादित्य शिंदेंनी केलेल्या बंडखोरीनंतर कमलनाथ यांचं सरकार कोसळलं होतं. त्यानंतर भाजपने शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केलं. दरम्यान, आता यावेळी या पाचही राज्यात कोणाला सत्ता देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मिझोराम आणि तेलंगणा या दोन राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांची सरकारं आहेत. तेलंगणा काँग्रेसने प्रतिष्ठा पणाला लावली आहे, त्यामुळे येथील निकालाकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

assembly elections 2023 exit poll live updates rajasthan telangana chhatishgarh mp mizoram

assembly elections 2023 exit poll live updates rajasthan telangana chhatishgarh mp mizoram

follow google news

लाइव्हब्लॉग बंद

  • 08:31 PM • 30 Nov 2023
    मध्य प्रदेश पुन्हा कमळ फुलणार!
    मध्य प्रदेश भाजप 47 आणि काँग्रेसला 41 टक्के मतदान झाल्याचं पाहायला मिळत आहेत. मध्य प्रदेशमध्ये भाजप प्रचंड मोठा विजय मिळवत असल्याचं एक्झिट पोलमधून पाहायला मिळत आहे. भाजपला 140-162 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे तर काँग्रेसला 68-90 जागा मिळण्याची शक्यता आहे.
  • 07:29 PM • 30 Nov 2023
    शिवराजसिंह चौहानांमुळे मध्य प्रदेशमध्ये भाजप तरणार?
    शिवराजसिंह चौहान यांच्या कामाचा दखल मतदार घेत असल्याचं पाहायला मिळतंय. शिवराजसिंह चौहान यांच्याएवढा तगडा नेता विरोधकांकडे नव्हता. त्याचा फायदा भाजपला होणार.
  • 07:28 PM • 30 Nov 2023
    बुंदेलखंडमध्ये काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता
    इंडिया टुडे-एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार बुंदेलखंडमध्ये 26 जागांवर भाजप बाजी मारणार असल्याचे अंदाज एक्झिट कौलमधून दिसत आहे. तर काँग्रेसला येथे मोठा फटका बसू शकतो. बुंदेलखंड हा उत्तर प्रदेशच्या सीमेवर असल्याने येथे बसपाला फायदा होण्याची शक्यता आहे.
  • 07:24 PM • 30 Nov 2023
    सचिन पायलट यांच्यामुळे काँग्रेसला फारसा फायदा नाहीच!
    सचिन पायलटच्या नावावर फायदा होणार असं फक्त चित्र होतं, मात्र त्याचा फारसा फायदा काँग्रेसला होणार नसल्याचं दिसतंय.
  • 07:24 PM • 30 Nov 2023
    मेवाड, मारवाड आणि जयपूरमध्ये कोणाला किती जागा?
    मेवाडमध्ये काँग्रेसला 29 जागा मिळण्याची शक्यता तर भाजपला 18 जागा मिळण्याची शक्यता आहे. मारवाडमध्ये भाजपला 40 टक्के तर काँग्रेसला 41 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. तर जयपूरमध्ये 19 जागांवर भाजप 6 तर काँग्रेस 11 जागांवर बाजी मारण्याची शक्यता.
  • 07:24 PM • 30 Nov 2023
    भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर...
    इंडिया टुडे-एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 80 ते100 जागा मिळण्याची शक्यता आहे तर काँग्रेसला 80-106 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर अपक्ष 9-18 जागांवर येण्याची शक्यता आहे.
  • 07:24 PM • 30 Nov 2023
    राजस्थानमध्ये पुन्हा काँग्रेसला सत्ता मिळणार?
    राजस्थानमध्ये भाजपने काँग्रेसला जोरदार टक्कर दिली असली तरीही त्यांना सत्ता मिळविण्यात म्हणावं तसं यश मिळालेलं नाही. इंडिया टुडे-एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, राजस्थानमध्ये काँग्रेसला काठावरचं बहुमत मिळू शकतं. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस सत्ता काबीज करणार.
  • 07:24 PM • 30 Nov 2023
    मध्य प्रदेश निवडणुकीच्या एक्झिट पोलला सुरुवात
    मध्य प्रदेश हे अत्यंत महत्त्वाचं राज्य असून तेथील सत्ता टिकविण्याचं मोठं आव्हान भाजपसमोर असणार आहे. पाहा यावेळी मध्य प्रदेशच्या जनतेने नेमका कोणाला कौल दिला आहे. एक्झिट पोलचे नेमके आकडे काय
  • 07:24 PM • 30 Nov 2023
    मध्य प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेसची थेट लढत
    मध्यप्रदेशमध्ये विधानसभेच्या 230 जागा असून सत्ता मिळविण्यासाठी 115 जागांवर विजय मिळविणं गरजेचं ठरणार आहे.
  • 07:24 PM • 30 Nov 2023
    शिवराजसिंह चौहान यांचं मध्य प्रदेशच्या जनतेला भावनिक आवाहन
    मध्य प्रदेशच्या निवडणुकीत शिवराजसिंह चौहान यांनी भावनिक आवाहन करुन मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला होता. शिवराजसिंह चौहान यांनी कायदा आणि विकासाच्या मुद्यावर यावेळी निवडणूक लढवली होती. आता याच गोष्टीचा भाजपला फायदा होतो की नाही हे आपल्याला थोड्याच वेळात समजेल.
  • 07:00 PM • 30 Nov 2023
    राजस्थानच्या एक्झिट पोलला सुरुवात
    काँग्रेसच्या हातात असलेलं राजस्थान मिळविण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न, भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर...
  • 07:00 PM • 30 Nov 2023
    भाजपला अनेक जागांवर बसू शकतो फटका
    राजस्थानमध्ये काही भागात भारतीय जनता पार्टीच्या जागांना मोठा फटका बसणार असल्याची शक्यता आहे. दलित आणि मुस्लीम मतदार राजस्थानमध्ये बजावणार महत्त्वाची भूमिका
  • 06:48 PM • 30 Nov 2023
    छत्तीसगड निवडणूक एक्झिट पोलला सुरुवात
    छत्तीसगड निवडणूक एक्झिट पोलला सुरुवात झाली असून येथे भाजपला मोठा फायदा मिळू शकतो. कारण भाजपकडून महिलांना दर महिन्याला 12 हजार रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे महिलांनी भाजपला पसंती दिल्याचे दिसून येत आहे.
  • 06:48 PM • 30 Nov 2023
    छत्तीसगडमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत
    छत्तीसगडमध्ये 90 जागांवर काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत होणार
  • 06:48 PM • 30 Nov 2023
    भाजप पुन्हा सत्ता खेचून आणणार का?
    भाजप आणि काँग्रेसमध्ये 5 जागांचा फरक आहे. भाजपने आतापर्यंत छत्तीसगडमध्ये तीन वेळा सरकार बनवले आहे. तर मागील निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली होती
  • 06:48 PM • 30 Nov 2023
    काँग्रेस देणार भाजपला दणका, पुन्हा सत्ता काँग्रेसकडे
    इंडिया टुडे-एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये भाजप 36 ते 46 जागांवर विजयी होऊ शकते. तर काँग्रेसला 40-50 जांगा मिळण्याची शक्यता, त्यामुळे छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता येऊ शकते
  • 04:04 PM • 30 Nov 2023
    ओपिनियन पोलमध्ये काय असतं?
    ओपिनियन पोल म्हणजे लोकांचे मत काय आहे? हे निवडणुकीपूर्वी पाहिलं जातं. यात सर्व लोक सहभागी आहेत, मग ते मतदार असोत वा नसो. यामध्ये, जनतेची निवडणुक नाडी मोजण्याचा प्रयत्न केला जातो. जो त्यांच्या अभिमुखतेवर अवलंबून असतो. यामध्ये जनता कोणकोणत्या मुद्द्यांवर मतदान करणार आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
  • 04:04 PM • 30 Nov 2023
    एक्झिट पोल आजच का होणार जाहीर?
    लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 126(A) नुसार, मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत एक्झिट पोल जारी केला जाऊ शकत नाही. तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान झाल्यानंतर निवडणुका संपत आहेत. त्यामुळे आज (30 नोव्हेंबर) एक्झिट पोल येणार आहेत.
  • 04:04 PM • 30 Nov 2023
    एक्झिट पोल म्हणजे काय?
    एक्झिट पोल हा एक प्रकारचा सर्व्हे आहे. यामध्ये कोणत्याही राज्य, मतदारसंघातील मतदारांना काही प्रश्न विचारले जातात. मतदारांनी कोणत्या पक्षाला मतदान केले हा मुख्य प्रश्न असतो. हे प्रश्न मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राबाहेर पडणाऱ्या मतदारांना विचारले जातात. हाच ओपिनियन पोल असतो. या प्रश्नांची उत्तरे गोळा करून त्याचे पद्धतशीरपणे विश्लेषण केले जाते. आणि त्यातून निष्कर्ष काढले जातात. हा निष्कर्ष एक्झिट पोलच्या रूपाने आपल्यासमोर येतो.एक्झिट पोल डेटा पूर्णपणे अचूक असणे आवश्यक नाही. हे सर्वेक्षणातील मतदारांना विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची दिशा यावर अवलंबून असते.
follow whatsapp