Assembly Elections 2023 Result Live : मिझोरममध्ये कुणाची सत्ता?
मुंबई तक
03 Dec 2023 (अपडेटेड: 08 Dec 2023, 06:46 AM)
Assembly elections 2023 Result Latest Update in Marathi : लोकसभा निवडणुकीपूर्वी महत्त्वाच्या असलेल्या राजस्थान (Rajasthan Assembly election 2023 Results), मध्य प्रदेश (Madhya Pradesh Assembly election 2023 Results), तेलंगणा (Telangana Assembly election 2023 Results) आणि छत्तीसगड (Chhattisgarh Assembly election 2023 Results) या राज्यातील मतमोजणी सुरू झालीये. चारही राज्यात कुणाला कौल मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून, वेगवेगळ्या एक्झिट पोलमधील कौलांमुळे संदिग्ध अवस्था आहे. त्यामुळे मतमोजणीतून चित्र स्पष्ट होणार आहे. लोकसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट म्हणून पाच राज्यातील निवडणुकीकडे बघितलं जातंय. त्यामुळे या राज्यात कोण ‘सत्ता’धीश होणार, यावर लोकसभेची गणितं आणि प्रचाराची दिशा ठरणार आहे. (Assembly elections 2023 Results Latest live updates)
ADVERTISEMENT
Mizoram Election Results 2023 Live Updates in Marathi
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 09:55 AM • 04 Dec 2023मिझोरममध्ये त्रिशंकू ट्रेंडमिझोरममध्ये सुरुवातीच्या कलामध्ये रंजक ट्रेंड दाखवत आहेत. येथे झोरम पीपल्स मूव्हमेंटने सुरुवातीला बहुमताचा आकडा ओलांडला होता, पण आता ती 15 जागांवर आघाडीवर आहे. सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट 11 जागांवर पुढे आहे. काँग्रेसने या लढतीत जोरदार एंट्री केली असून 10 जागांवर आघाडीवर आहे. भाजपही 2 जागांवर आघाडीवर आहे.
- 09:53 AM • 04 Dec 2023Mizoram election result : मिझोरममध्ये काट्याची टक्कर, \\\\\\\'ZPM ने MNFला टाकलं मागे, काँग्रेसही शर्यतीतMizoram Assembly Election Result Updates: मिझोरम विधानसभा निवडणुकीची 2023 ची मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये, झोराम पीपल्स मूव्हमेंट सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंटच्या खूप पुढे गेली आहे. काँग्रेस पक्ष तिसऱ्या क्रमांकावर पिछाडीवर आहे. मिझोरममध्ये सीएम झोरमथंगा यांची MNF सत्तेवर आहे. (मिझोरम विधानसभा निवडणूक निकाल) इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलने मिझोरममध्ये MNF ला मोठा फटका बसण्याचा अंदाज वर्तवला होता. येथे सत्ताविरोधी लाट होती. लालदुहोमाच्या नेतृत्वाखाली झेडपीएमच्या बाजूने लाट असल्याचे दिसून आले. कारण 'मिझोराममध्ये पुढचा मुख्यमंत्री कोण होणार?' या प्रश्नाला उत्तर देताना 40 टक्के लोकांची पसंती लालदुहोमाला होती. हे ट्रेंडमध्येही दिसून येत आहे.
- 05:43 PM • 03 Dec 2023या पराभवातून हेच दिसले की...; सत्ता गेल्यानंतर अशोक गेहलोत काय बोलले?राजस्थानात काँग्रेसचा पराभव झाला. पराभवाचा स्वीकार करत अशोक गेहलोत म्हणाले, "राजस्थानच्या जनतेने दिलेल्या जनादेशाच्या आम्ही नम्रपणे स्वीकार करतो. या पराभवातून हेच दिसले की आम्ही आमच्या योजना, कायदे आणि घडवलेले बदल जनतेपर्यंत पोहोचवण्यात कमी पडलो. मी नव्या सरकारला शुभेच्छा देतो. माझा त्यांना सल्ला आहे की, आम्ही काम करूनही यशस्वी झालो नाही, याचा अर्थ असा नाही की, त्यांनी सरकारमध्ये येऊन कामच करू नये. जुनी पेन्शन योजना, चिरंजीवी सह सर्व योजना आणि राजस्थानच्या विकासाला जी गती आम्ही पाच वर्षात दिली, ती पुढे घेऊन जावी. मी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचे आभार मानतो ज्यांनी या निवडणुकीत मेहनत केली. सर्व मतदारांचे आभार मानतो, ज्यांनी आमच्या विश्वास दाखवला."
- 05:30 PM • 03 Dec 2023तेलंगणातील मतदारांशी मोदींची बातट्विटमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, "माझ्या प्रिय तेलंगणातील भगिनींनो आणि बांधवांनो, भाजपला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद. गेल्या काही वर्षांमध्ये हा पाठिंबा वाढतच चालला आहे आणि पुढील काळातही हा ट्रेंड कायम राहील. तेलंगणासोबतचे आमचे नाते अतूट आहे आणि आम्ही लोकांसाठी काम करत राहू. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचेही मी कौतुक करतो", असे पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणातील निकालानंतर म्हणाले.
- 04:42 PM • 03 Dec 2023तीन राज्यात भाजपचा विजय, PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..."जनता जनार्दनाला नमन करतो. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील निकाल हे दर्शवतात की भारतातील लोक सुशासन आणि विकासाच्या राजकारणासोबत ठाम आहेत. भाजप यावर ठामपणे उभी आहे.""मी या राज्यांतील लोकांचे त्यांच्या अटळ पाठिंब्याबद्दल आभार मानतो आणि त्यांना आश्वासन देतो की आम्ही त्यांच्या कल्याणासाठी अथक प्रयत्न करत राहू.""कष्ट घेणाऱ्या पक्ष कार्यकर्त्यांचे विशेष आभार. त्यापैकी प्रत्येक अनुकरणीय आहे, त्यांनी अथक परिश्रम करून आमचा विकासाचा अजेंडा लोकांसमोर मांडला आहे", अशा शब्दात मोदींनी चार राज्याच्या निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली.
- 01:59 PM • 03 Dec 2023राजस्थानमध्ये भाजपचा मुख्यमंत्री कोण? दोन महिला नेत्यांसह सात नावे चर्चेतराजस्थानमध्ये भाजप बंपर जागांसह सरकार स्थापन करणार असल्याचे दिसत आहे. भाजप सध्या 160 जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, मुख्यमंत्री कोण होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेत काही नावे ठळक आहेत.त्यात पहिले नाव दोनदा मुख्यमंत्री राहिलेल्या वसुंधरा राजे यांचे आहे. या यादीत दिया कुमारीचाही समावेश आहे. या यादीत भूपेंद्र यादव (केंद्रीय मंत्री), ओम बिर्ला (लोकसभा अध्यक्ष), गजेंद्र सिंह शेखावत (केंद्रीय मंत्री), अश्विनी वैष्णव (रेल्वे मंत्री) आणि खासदार बालकनाथ यांच्या नावांची चर्चा आहे.
- 11:51 AM • 03 Dec 2023राजस्थान-छत्तीसगडमध्ये बुडालेल्या काँग्रेसला तेलंगणाचा हातराजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेसला जबर हादरा बसला. दोन महत्त्वाची राज्य काँग्रेसच्या हातून सुटली आहे. तर तेलंगणामध्ये मात्र, बीसीआरएसच्या गडालाच सुरुंग लावला आहे. तेलंगणात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. काँग्रेस ६५ जागांवर आघाडीवर आहे. सत्ताधारी बीआरएस ३५ जागांवर पुढे आहे. भाजपने ९ जागांवर आघाडी घेतली असून, एमआयएम ३ ठिकाणी पुढे आहे.
- 11:32 AM • 03 Dec 2023काँग्रेसला लोळवलं, राजस्थान-छत्तीसगडमध्ये फुलले कमळ!चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे कल समोर आल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरताना दिसत आहेत. ११.३० वाजेपर्यंत पार पडलेल्या मतमोजणीच्या फेरीनंतर छत्तीसगडमध्ये भाजपने काँग्रेसला पिछाडीवर टाकले आहे. भाजप ४६ जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस ४० मतदारसंघात पुढे आहे.मध्य प्रदेशात भाजपने पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजपने तब्बल १६० जागांवर आघाडी घेतली असून, काँग्रेसने ६६ जागांवर आघाडीवर आहे. राजस्थान काँग्रेसच्या हातून सुटताना दिसत आहे. राजस्थानात भाजप ११५ मतदारसंघात पुढे आहे, तर काँग्रेसने ६७ जागांवर आघाडी घेतली आहे.
- 10:47 AM • 03 Dec 2023मध्य प्रदेशात पुन्हा भाजप!भाजप - 148 जागांवर आघाडी, काँग्रेस - 60 जागांवर आघाडी
- 10:43 AM • 03 Dec 2023Rajasthan Elections Results Live : कोण आहे आघाडीवर?भाजप - 99 जागांवर आघाडी, काँग्रेस - 77 जागांवर आघाडी, भारत आदिवासी पार्टी - 4 जागांवर आघाडी, अपक्ष उमेदवार - 9 जागांवर आघाडी
- 10:08 AM • 03 Dec 2023Assembly Election Results 2023 : भाजपने मध्य प्रदेश राखले, छत्तीसगडमध्ये धाकधूक वाढलीविधानसभा निवडणुकीचे कल समोर येत असून, आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशात भाजपने आघाडी घेतली आहे. भाजप १०४ जागांवर पुढे आहे. दुसरीकडे काँग्रेसची पिछेहाट झाली आहे. काँग्रेस ४४ मतदारसंघात आघाडीवर आहे.काँग्रेसच्या हातात सत्तेची सूत्र असलेल्या राजस्थानात भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. इथे भाजप १०० जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस ६८ ठिकाणी आघाडीवर आहे. छत्तीसगडमध्ये सत्ता परिवर्तन होईल, असेच कलातून दिसत आहे. इथे भाजप २३ जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेसने २० जागांवर आघाडी घेतली आहे.तेलंगणात काँग्रेस 'राज'के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील बीआरएस सत्तेवरून पायउतार होईल असेच दिसत आहे. काँग्रेसने ४३ जागांवर आघाडी घेतली आहे. भारत राष्ट्र समितीचे २४ उमेदवार आघाडीवर आहे, तर भाजप एकाच जागेवर आघाडीवर आहे.
- 09:56 AM • 03 Dec 2023Rajasthan Assembly Elections Results Live : कोण आहे आघाडीवर?भाजप - ९१ जागांवर आघाडी काँग्रेस - ६९ जागांवर आघाडी भारत आदिवासी पार्टी - ५ जागांवर आघाडी अपक्ष उमेदवार - ६ जागांवर आघाडी
- 09:51 AM • 03 Dec 2023भाजप पुन्हा सरकार स्थापन करत आहे -शिवराज चौहानमध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीत कोण विजयी होणार याचे चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. भाजपने सुरुवातीपासून मुसंडी घेतली आहे. भाजपने आघाडी घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विट करत आनंद व्यक्त केला आहे."भारत माता की जय, जनता जनार्दनाचा जय. आज मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक निकालाचे कल समोर येत आहे. मला विश्वास आहे की, जनतेच्या आशीर्वादाने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वाखाली भाजप पूर्ण बहुमत घेऊन सरकार स्थापन करत आहे. भाजपच्या सर्व उमेदवारांना मनापासून शुभेच्छा", असे शिवराज सिंह यांनी म्हटले आहे.
- 09:42 AM • 03 Dec 2023मध्य प्रदेशात कोण किती जांगावर आघाडीवरभाजप - ५७ जागांवर आघाडी काँग्रेस - १७ जागांवर आघाडी भारत आदिवासी पार्टी - १ जागेवर आघाडीवर
- 09:39 AM • 03 Dec 2023राजस्थान विधानसभा निकाल - भाजपची घोडदौडभाजप - ६१ जागांवर आघाडी काँग्रेस - ४० जागांवर आघाडी भारत आदिवासी पार्टी - ४ जागांवर आघाडीवर बहुजन समाज पार्टी - २ जागांवर आघाडीवर राष्ट्रीय लोक दल - १ जागेवर आघाडीवर आझाद समाज पार्टी - १ जागेवर आघाडीवर राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी - १ जागेवर आघाडीवर अपक्ष उमेदवार - ४ जागांवर आघाडी
- 09:37 AM • 03 Dec 2023छत्तीसगड विधानसभा निकाल २०२३ - भाजप की काँग्रेस?काँग्रेस - ०६ जागांवर आघाडी भाजप - ०५ जागांवर आघाडी
- 09:36 AM • 03 Dec 2023तेलंगणा मतमोजणी - सत्तेत कोण येणार?भारत राष्ट्र समिती - १५ जागांवर आघाडी काँग्रेस - १५ जागांवर आघाडी भाजप - ०१ जागेवर आघाडी
- 09:34 AM • 03 Dec 2023मध्य प्रदेश मतमोजणी - कोण आहे आघाडीवर?भाजप - ३७ जागांवर आघाडी काँग्रेस - ०७ जागांवर आघाडी भारत आदिवासी पार्टी - १ जागेवर आघाडीवर
- 09:32 AM • 03 Dec 2023कोणते नेते पिछाडीवर?राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आघाडीवर. राजवर्धन राठोड पिछाडीवर, वसुंधरा राजे आघाडीवर. सचिन पायलट आघाडीवर
- 09:30 AM • 03 Dec 2023राजस्थान मतमोजणी - कोण आहे आघाडीवर?भाजप - ३४ जागांवर आघाडी काँग्रेस - 28 जागांवर आघाडी भारत आदिवासी पार्टी - ४ जागांवर आघाडीवर बहुजन समाज पार्टी - २ जागांवर आघाडीवर राष्ट्रीय लोक दल - १ जागेवर आघाडीवर आझाद समाज पार्टी - १ जागेवर आघाडीवर राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी - १ जागेवर आघाडीवर
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT