ठाणे: मनसुख हिरने हत्याप्रकरणात महाराष्ट्र एटीएसने दोन जणांना अटक केल्याचं वृत्त काही वेळापूर्वी समोर आलं होतं. आता याच प्रकरणात आणखी एक नवी माहिती समोर आली आहे. ती म्हणजे या हत्या प्रकरणात एका माजी पोलीस कॉन्स्टेबलचा हात असल्याचा संशय एटीएसला आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एक बुकी आणि एका माजी पोलीस कर्मचाऱ्याला एटीएसने अटक केली आहे.
ADVERTISEMENT
नरेश गोर (वय 31 वर्ष) हा एक बुकी अशून दुसरा आरोपी विनायक शिंदे हा आधी मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल होता. 55 वर्षीय शिंदे हा लखन भैय्या एन्काउंटर केसमधील दोषी आहे. गेल्या काही दिवसांपासून तो पॅरोलवर होता.
दुसरीकडे महाराष्ट्र एटीएसने आपल्या प्रेस नोटमध्ये सचिन वाझे हेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचं नमूद केलं आहे. सचिन वाझे यांना नरेश या बुकीकडून काही सिम कार्ड पुरवण्यात आले होते. जे या गुन्ह्यात वापरले गेल्याचं एटीएसने म्हटलं आहे.
Mansukh Hiran हत्येप्रकरणी ATS कडून दोन आरोपींना अटक
दरम्यान, एटीएसला असाही संशय आहे की, लखन भैय्या एन्काउंटरमधील दोषी विनायक शिंदे हा पॅरोलवर असताना सचिन वाझे यांना अनेकदा भेटला होता आणि त्यांच्या बेकायदेशीर कामामध्ये मदत देखील करायचा.
मनसुख हिरेन प्रकरणात नरेश गोर आणि विनायक शिंदे या दोघांनाही ठाणे कोर्टाने 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी या दोघांकडून एटीएसचे अधिकारी त्यांची हत्या प्रकरणातील माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत.
मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणी गृहमंत्र्यांचा पोलिसांवर दबाव? परमबीर यांच्या पत्रात महत्वाची माहिती
मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास ATS कडून NIA
दरम्यान, मनसुख हिरेन हत्या प्रकरणी ATS ने दोन जणांना अटक केलेली असली तरीही आता याप्रकरणाचा तपास NIA करणार आहे. यापूर्वी या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएसकडे होता. मात्र याप्रकरणी एटीएसला फार गती मिळाली नसल्याने आता हा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला असल्याचं समजतं आहे.
दरम्यान, मनसुख हिरेन हत्या प्रकरण NIAकडे हस्तांतरित करण्याबाबतची अधिसूचना देखील जारी झाली आहे. एनआयएच्या प्रवक्त्याने या संदर्भातील आदेश प्राप्त झाल्याच्या वृत्ताला कालच (20 मार्च) दुजोरा देण्यात आला होता.
सुरुवातीला संशयित स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटीनच्या कांड्या सापडल्याने त्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला होता. त्यानंतर एनआयएने चौकशीअंती पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली होती. दुसरीकडे याचसंबंधी मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास हा महाराष्ट्र एटीएस करत होता. पण आता या प्रकरणी एनआयए तपास करणार आहे.
मोठी बातमी: मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपासही NIA कडे, ATS ला धक्का
NIA कडे कोणत्या आधारे सोपविण्यात आला मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास?
अँटेलिया स्फोटकं प्रकरणात सुरुवातीला एनआयए तपास करत होती. त्यामुळे मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एनआयए करु शकतं की नाही? असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात होता. पण अशाप्रकारचा तपास एनआयए करु शकतं.
कारण NIA कायद्याच्या कलम 8 अंतर्गत परस्पर निगडीत प्रकरणाची चौकशी एनआयए करु शकतं. याच कलमानुसार आता एनआयए अँटेलिया कार प्रकरणासोबत मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास देखील करणार आहे.
ADVERTISEMENT