मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास ATS कडे-अनिल देशमुख

मुंबई तक

• 02:18 PM • 05 Mar 2021

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास ATS कडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. २५ फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या निवासस्थानाबाहेर एक संशयित स्कॉर्पिओ पोलिसांना आढळली होती. या स्कॉर्पिओमध्ये जिलेटिनच्या कांड्या होत्या. ही स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती. या घटनेच्या एक दिवस आधी ही कार चोरीला गेली होती. आज […]

Mumbaitak
follow google news

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास ATS कडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. २५ फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या निवासस्थानाबाहेर एक संशयित स्कॉर्पिओ पोलिसांना आढळली होती. या स्कॉर्पिओमध्ये जिलेटिनच्या कांड्या होत्या. ही स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती. या घटनेच्या एक दिवस आधी ही कार चोरीला गेली होती.

हे वाचलं का?

आज मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत आढळला आहे. हे प्रकरण NIA कडे अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात यावं अशी मागणी विधासभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या कार प्रकरणात अनेक योगायोग आहेत असंही फडणवीस यांनी म्हटलं होतं. तसंच सचिन वाझे हे पोलीस अधिकारी घटना जिथे घडली तिथे सर्वात आधी कसे पोहचले असाही प्रश्न उपस्थित केला होता.

मनसुख हिरेन हे कालपासून बेपत्ता होते, ते बेपत्ता असल्याची तक्रार ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. आज विधानसभेत अँटेलिया बाहेरच्या कारचा आणि त्या घटनेचा मुद्दा जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला तेव्हा त्यांनी या प्रकरणातल्या योगायोगांकडे सरकारचं लक्ष्य वेधलं. तसंच मनसुख हिरेन यांना सुरक्षा देणं आवश्यक आहे असंही म्हटलं होतं. सचिन वाझे हे त्या ठिकाणी कसे पोहचले? क्रॉफर्ड मार्केटमध्ये मनसुख हिरेन हे नेमके कुणाला भेटले होते? असे सगळे प्रश्न उपस्थित केले होते.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण CBI कडे सोपवावं-नारायण राणे

देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रश्न उपस्थित केल्यानंतर आणि मनसुख हिरेन यांना सुरक्षा देण्याची मागणी विधानसभेत केल्यच्या दोन तासानंतरच मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत सापडल्याची बातमी समोर आली. मनसुख हिरेन यांच्या प्रकरणाचा तपास आता ATS कडे सोपवण्यात आला आहे. मात्र त्यांच्या मृत्यूविषयी जेव्हा विधानसभेत चर्चा झाली तेव्हा सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सचिन वाझेंवरून खडाजंगी झाल्याचं पाहण्यास मिळालं. सचिन वाझे यांनी अर्णब गोस्वामीवर कारवाई केल्याने विरोधक आता त्यांना लक्ष्य करू पाहात आहेत का? असा प्रश्न गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विचारला. यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचं राजकारण करू नये.. आम्ही सचिन वाझे कोण त्यांनी कोणावर कारवाई केली, कोणाचा एन्काऊंटर केला ते ठाऊक नाही असं म्हटलं.

फडणवीसांनी आरोप केलेले सचिन वाझे आहेत तरी कोण?

तसंच या प्रकरणात ठाकरे सरकार कुणालातरी वाचवू पाहातं आहे असाही आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. या प्रकरणाचा संपूर्ण तपास हा राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA कडे सोपवण्यात यावा अशीही मागणी केली. या मागणीनंतर एक तासाच्या आत अनिल देशमुख यांनी या मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास हा ATS कडे सोपवणार असल्याचं जाहीर केलं.

    follow whatsapp