सावंतवाडी : सावंतवाडीतील व्यापाऱ्यांच्या व्हॉटसअॅप ग्रुपमधून काढल्याच्या रागातून व्यापार व उद्योग सेलचे जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांना काही शनिवारी संध्याकाळी जणांकडून मारहाण करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार हे सर्वजण मनसेचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले जात आहे.
ADVERTISEMENT
संशयितांमधील एक जण व्यापारी आहे. त्यावरूनच हा प्रकार घडल्याच समोर येत आहे. दरम्यान, याबाबत तक्रार पुंडलिक दळवी यांनी तक्रार दिली असून मारहाण करणाऱ्यांपैकी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
पक्षीय कोणतेही मतभेद नसताना केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी पक्षाचा वापर करत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसांनी दळवी एकटे असताना जमाव करून हल्ला केला. या लोकांचा पुर्व इतिहास तपासून गुन्हे दाखल करण्यात यावे, मारहाण करताना संबंधित हे मद्याच्या नशेत होते असा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केला.
सावंतवाडीची ओळख हे अंमली पदार्थांच किंवा मद्याच शहर, चोरट्या मद्याची वाहतूक अशी होत आहे ती पुसुन काढण्याची वेळ आहे. पोलिस प्रशासनाने अशा लोकांवर कारवाई करत ती पुसून टाकावी असं मत माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केले.
तसेच आम्ही सर्वजण देखील संघर्षातून तयार झालेले आहोत. राजकीय संघर्ष आम्हाला नवीन नाही. परंतु चुकीच्या कारणासाठी समाजात स्थान असणाऱ्या एखाद्या पक्षाच्या तालुकाध्यक्षाला वैयक्तिक कारणासाठी पक्षीय ढाल करून हल्ला होणे चुकीच आहे. अशा लोकांनी एकटे असताना हल्ला केला म्हणजे आपण जिंकलो अस वाटत असेल परंतु असा प्रकार करण्याचा पुन्हा प्रयत्न केल्यास जशास तस प्रत्यूत्तर दिल जाईल असा इशाराही त्यांनी दिला.
ADVERTISEMENT