नवीन वर्षाच्या जल्लोषात टाळा ‘या’ गोष्टी, नाहीतर जावं लागेल तुरुंगात!

मुंबई तक

• 05:33 AM • 31 Dec 2022

New Year 2023: आज ३१ डिसेंबर, २०२२ वर्षातील शेवटचा दिवस. हा दिवस प्रत्येकाला एखाद्या सण-समारंभापेक्षा कमी नाही. या दिवशी प्रत्येकाचा उत्साह हा काही वेगळाच असतो आणि त्याला साजरा करण्याची पद्धतही… काहीजण आपल्या कुटुंबासह तर काही मित्रांसोबत नवीन वर्षाचे स्वागत करतात. मात्र, नवीन वर्ष साजरे करताना काही गोष्टींचे भान बाळगणे हे महत्त्वाचे असते. अशा काही गोष्टी […]

Mumbaitak
follow google news

New Year 2023: आज ३१ डिसेंबर, २०२२ वर्षातील शेवटचा दिवस. हा दिवस प्रत्येकाला एखाद्या सण-समारंभापेक्षा कमी नाही. या दिवशी प्रत्येकाचा उत्साह हा काही वेगळाच असतो आणि त्याला साजरा करण्याची पद्धतही… काहीजण आपल्या कुटुंबासह तर काही मित्रांसोबत नवीन वर्षाचे स्वागत करतात. मात्र, नवीन वर्ष साजरे करताना काही गोष्टींचे भान बाळगणे हे महत्त्वाचे असते. अशा काही गोष्टी आहेत ज्या कटाक्षाने पाळल्या पाहिजेत आणि त्या नियमांचं पालन केलं नाही तर, तुरूंगातही जावे लागू शकते. (new year wishes 2023)

हे वाचलं का?

नवीन वर्षाच्या निमित्ताने काही कार्यक्रम आयोजित केले जातात. यात काही असे कार्यक्रम असतात जे आपल्याला अडचणीत आणू शकतात. मोठ्या शहरांमध्ये अनेकदा रेव्ह पार्ट्या होतात. या पार्ट्या छुप्या पद्धतीने होतात, ज्यात ड्रग्ज, दारू, गाणी आणि डान्स हे सर्व असते. या पार्ट्या टाळाव्यात नाहीतर, याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.

नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये काय करू नये? पकडले गेल्यास होणार ‘ही’ शिक्षा, जाणून घ्या…

दरवर्षी नववर्षानिमित्त पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात येतो. नागरिकांची सुरक्षा हे त्यांचे मुख्य ध्येय असते. नवीन वर्षाच्या उत्साहात काही लोक शुद्ध हरपतात. अनेकदा जास्त दारू पिऊन नंतर गाडीही चालवतात. असे करणे बेकायदेशीर तर आहेच, पण ते जीवघेणेही आहे. असे कित्येक लोक आहेत ज्यांचा मद्यपान करून वाहन चालवल्यामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे हे टाळावे. देशात दारू पिण्यास बंदी नाही, पण दारू पिऊन गाडी चालवणे बेकायदेशीर आहे.

एवढच नाही तर, नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये अतिवेगाने गाडी चालवणे हाही गुन्हा आहे, असे करताना पहिल्यांदा पकडल्यास ६ महिने तुरुंगवास किंवा दंडही भरावा लागू शकतो. दुसऱ्यांदा पकडल्यास दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा दोन हजार रुपये दंड अशा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. सध्याची तरूणाई सेलिब्रेशनसाठी पार्ट्यांना जाणं पसंत करते. परंतु, काही ठिकाणी न जाणे यातच भले असते. रेव्ह पार्टी करताना पकडले गेल्यास आणि त्या पार्टीत ड्रग्जही वाटले जात असतील तर, तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागते. अशा प्रकरणांमध्ये जामीन मिळणेही कठीण होते. आपल्या देशात अमली पदार्थ बाळगणे, खरेदी करणे, विकणे किंवा सेवन करणे हा कायदेशीर गुन्हा आहे.

नवीन वर्षात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पोलीसही सज्ज असतात. मुंबई पोलिसांनीही (Mumbai Police) सुरक्षा वाढवली आहे. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी बीच, जुहू बीच, वांद्रे बसस्टँड यासह अनेक विशेष भागात प्रचंड गर्दी जमवण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

    follow whatsapp