Bank Holiday: बँकेची कामं आजच उरका, एप्रिलमध्ये आहेत भरपूर सुट्ट्या!

मुंबई तक

28 Mar 2023 (अपडेटेड: 28 Mar 2023, 11:14 AM)

एप्रिल महिन्यात बँकेशी संबंधित काही महत्त्वाचे काम असेल तर ते आजच निकाली काढा, कारण एप्रिलमध्ये जवळजवळ अर्धा महिना बँका बंद राहतील. एप्रिलमध्ये रविवार आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारच्या सुट्ट्यांसह एकूण 16 दिवस सुट्ट्या आहेत.

bank holidays in april 2023 see full list of holidays

bank holidays in april 2023 see full list of holidays

follow google news

Bank Holiday list: मुंबई: नवीन आर्थिक वर्ष (New Financial Year) सुरू होण्यासाठी अवघे तीन दिवस उरले आहेत. दर महिन्याप्रमाणे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने एप्रिल महिन्यासाठी देखील बँकांच्या सुट्ट्यांची ( Bank Holiday) यादी जारी केली आहे. तुमचेही एप्रिल महिन्यात बँकेशी संबंधित काही महत्त्वाचे काम असेल तर ते आजच निकाली काढा, कारण एप्रिलमध्ये जवळजवळ अर्धा महिना बँका बंद राहतील. एप्रिलमध्ये रविवार आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारच्या सुट्ट्यांसह एकूण 16 दिवस सुट्ट्या आहेत. (bank holiday get your bank related work done today itself holidays are full in april this is the complete holiday list)

हे वाचलं का?

सुट्ट्या पाहा आणि मगच बँकेच्या कामसाठी बाहेर पडा

नवीन आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या महिन्यात बँक कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात सुट्ट्या असणार आहेत. पण, बँकिंग सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यानुसार भिन्न असणार आहेत. कारण ते प्रत्येक राज्यात असणाऱ्या सण आणि उत्सवांवर ते अवलंबून असते. RBI च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुम्ही महिन्यानुसार बँक हॉलिडे लिस्ट सहज तपासू शकता. अशा परिस्थितीत, ही यादी तपासल्यानंतरच पुढच्या महिन्यात तुम्ही कोणत्या दिवशी बँकेचं काम करायचं हे ठरवू शकतात. जेणेकरून तुम्हाला तुमच्या कामाबाबत योग्य प्लॅनिंग करता येईल, अन्यथा नाहक मनस्ताप सहन करावा लागू शकतो.

अधिक वाचा- Bank बुडाल्यानंतर ठेवीदारांच्या पैशांचं काय होतं? जाणून घ्या भारतातील नियम

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) विविध राज्ये आणि कार्यक्रमांच्या आधारे बँक हॉलिडे लिस्ट तयार करते आणि  वेबसाइटवर ही यादी अपडेट केली जाते. तुम्ही तुमच्या मोबाइलवरील या लिंकवर (https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx) क्लिक करून महिन्याच्या प्रत्येक बँक सुट्टीबद्दल देखील जाणून घेऊ शकता.

ही आहे Bank Holiday यादी 

तारीख दिवस कारण राज्य
1 एप्रिल शनिवार बँक अकाउंट क्लोझिंग मिझोरम, चंदीगड, मेघालय-हिमाचल प्रदेश सोडून सर्व राज्य
2 एप्रिल रविवार साप्ताहिक सुट्टी सर्व राज्य
3 एप्रिल सोमवार महावीर जयंती भोपाळ
4 एप्रिल मंगळवार महावीर जयंती गुजरात, मिझोरम, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, चंदीगड तामिळनाडू, राजस्थान, लखनऊ, नवी दिल्ली, छत्तीसगढ, झारखंड
5 एप्रिल बुधवार बाबू जगजीवन राम जन्मदिन तेलंगणा
7 एप्रिल शुक्रवार गुड फ्रायडे त्रिपुरा, गुजरात, आसाम, राजस्थान, जम्मू, हिमाचल प्रदेश, श्रीनगर सोडून सर्व राज्य
8 एप्रिल शनिवार दुसरा शनिवार सर्व राज्य
9 एप्रिल रविवार साप्ताहिक सुट्टी सर्व राज्य
14 एप्रिल शुक्रवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शिमला, शिलाँग सोडून सर्व राज्य
15 एप्रिल शनिवार विसू/बिहू/हिमाचल डे/बांग्ला नववर्ष त्रिपुरा, आसाम, केरळ, बंगाल, हिमाचल प्रदेश
16 एप्रिल रविवार साप्ताहिक सुट्टी सर्व राज्य
18 एप्रिल मंगळवार शब-ए-कदर जम्मू आणि श्रीनगर
21एप्रिल शुक्रवार ईद-उल-फितर (रमजान ईद)/गरिया पूजा/जुमत-उल-विदा त्रिपुरा, जम्मू आणि श्रीनगर, केरळ
22 एप्रिल शनिवार चौथा शनिवार सर्व राज्य
23 एप्रिल रविवार साप्ताहिक सुट्टी सर्व राज्य
30 एप्रिल रविवार साप्ताहिक सुट्टी सर्व राज्य

 

अधिक वाचा- Gold price : 10 हजाराहून 60 हजारांवर; 17 वर्षात सोन्याचे भाव सहापटीने कसे वाढले?

ऑनलाइन पूर्ण करू शकता बँकिंगची कामं

बँकेच्या सुट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरे होणारे सण किंवा त्या राज्यांमध्ये होणाऱ्या इतर कार्यक्रमांवरही अवलंबून असतात. म्हणजेच, काही राज्य आणि शहरांमध्ये देखील सुट्ट्या भिन्न आहेत. तथापि, बँकांच्या शाखा बंद असल्या तरीही, तुम्ही तुमची बँकिंगशी संबंधित महत्त्वाची कामं ऑनलाइन करू शकता. ही सुविधा नेहमीच 24 तास कार्यरत असते.

अधिक वाचा- आता आधार कार्डसंबंधी हे काम होईल मोफत; पण फक्त 14 जूनपर्यंत

    follow whatsapp