वसंत मोरे, बारामती: अंगणात कोंबड्या आल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात थेट डोक्यात कुऱ्हाडीने वार करत महिलेची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती तालुक्यातल्या करावागज इथे घडला आहे. याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे.
ADVERTISEMENT
गंगूबाई तात्याराम मोरे असे या घटनेत मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. या हत्येप्रकरणी आरोपी किरण दादा मोरे याला अटक करण्यात आली आहे.
या संपूर्ण घटनेबाबत तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी माहिती देताना सांगितले की, मयत महिला आणि आरोपीचे घर समोरासमोर आहे. दोन्ही कुटुंबामध्ये अंगणात कोंबड्या येण्यावरुन आणि पाच फूटांच्या जागेवरुन वारंवार वाद होत होता.
रविवारी (10 जानेवारी) दुपारी देखील याच कारणामुळे आरोपीच्या बायकोसोबत गंगुबाई यांचा वाद झाला होता. यावेळी रागाच्या भरात किरण याने थेट गंगूबाईच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केला. या हल्ल्यात गंगुबाई गंभीर जखमी झाल्या. त्यामुळे त्यांना तात्काळ उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आलं. मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला काटा, गळा चिरून केली हत्या
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली. सध्या बारामती पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश विधाते यांच्याकडे तपासकार्य सोपविण्यात आलं आहे.
क्षुल्लक कारणावरुन शेजारच्यासोबत भांडण, इलेक्ट्रिक इंजिनीअरने केला खून
दुसरीकडे पुण्यातही अगदीच क्षुल्लक कारणावरुन एका इलेक्ट्रिक इंजिनीअरने 39 वर्षीय व्यक्तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घरावर बांधकामाचा कचरा पडत असल्यामुळे झालेल्या वादातून पुण्यात एका इंजिनीअरने शेजाऱ्याचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना घडली आहे. बिबवेवाडी भागात घडलेल्या या घटनेत 39 वर्षीय शरद पुरी यांचा जागीच मृत्यू झाला.
भीषण… 30 वर्षीय मुलाने चावा घेत आईची करंगळीच तोडली!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी भागात मयत शरद पुरी आणि आरोपी सचिन कपटकर हे शेजारी राहत होते. मयत शरद पुरी यांच्या घरात काम सुरु असल्यामुळे त्यांचा कचरा हा सचिन यांच्या घरावर पडायचा. यावरुन दोघांमध्ये आज सकाळी पावणे दहा वाजल्याच्या दरम्यान वाद झाला.
या वादातून आरोपी सचिन कपटकरने शरद याच्या छातीत चाकू खूपसला. ज्यामध्ये शरद याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी सचिन कपटकरला अटक केली.
ADVERTISEMENT