मुंबई : बीबीसी (BBC) या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या दिल्ली आणि मुंबईच्या कार्यालयांमध्ये आयकर विभागाने (Income Tax) सर्वेक्षण सुरु केलं आहे. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांचे फोनही जप्त करण्यात आले आहेत. तसंच कर्मचाऱ्यांना कार्यालय सोडून घरी जाण्यास सांगण्यात आलं असल्याची माहिती आहे. लंडनस्थित बीबीसीच्या कार्यालयातून या कारवाईची माहिती देण्यात आली आहे. विरोधकांनी या कारवाईचा संबंध बीबीसीवर केंद्र सरकारने बंदी घालण्यात आलेल्या डॉक्यूमेंटरीशी असल्याचं सांगितलं आहे. (The Income Tax Department has started a survey at the offices of the BBC in Mumbai and Delhi.)
ADVERTISEMENT
हे सर्वेक्षण का करण्यात आलं? IT ने काय सांगितलं?
या कारवाईबद्दल आयटीने माहिती दिली आहे. बीबीसीने जाणीवपूर्वक ट्रान्सफर प्राइसिंग नियमांचे पालन केलं नाही, तसेच नफ्यातील रक्कम वळवल्यामुळे हे सर्वेक्षण करण्यात आलं, असं आयटी विभागानं म्हटलं आहे. बीबीसीच्या बाबतीत या नियमांचं पालन गेल्या काही वर्षांपासून होत नाही. त्यासाठी त्यांना काही नोटीशी देखील दिल्या होत्या. करासह अन्य फायद्यासाठी किंमतीमध्ये फेरफार करण्यात आले. नियमांचं उल्लंघन करण्यात आलं, असे आरोप आयकर विभागाने केले आहेत. त्यामुळे हे सर्वेक्षण करण्यात आलं आहे.
BBC कार्यालयात Income Tax टीम, फोन जप्त करुन कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी
आयटी विभागानं तीन आरोप केले आहेत :
-
ट्रान्सफर प्रायसिंग नियमांचे पालन केले नाही.
-
ट्रान्सफर प्रायसिंग नियमांचे सतत आणि जाणीवपूर्वक उल्लंघन.
-
नफ्याची रक्कम जाणीवपूर्वक वळवणे.
छापा आणि सर्वेक्षणमध्ये काय फरक असतो?
-
आयकर कायद्यात Raid ऐवजी ‘Search’ हा शब्द वापरण्यात येतो. तर ‘Survey’ या शब्दाबद्दल या कायद्यात उल्लेख आहे.
-
आयकर कायद्यात या ‘Search’ आणि ‘Survey’ या दोन्ही शब्दांच्या वेगवेगळ्या व्याख्या करण्यात आली आहे.
-
आयकर कायदा-1961 च्या कलम-133A अंतर्गत ‘सर्वेक्षण’ची तरतूद आहे.
-
सर्वेक्षणाचा उद्देश हा केवळ अघोषित उत्पन्न आणि मालमत्तेसंबंधी माहिती गोळा करणे हा असतो.
-
याशिवाय संबंधित व्यक्तीनं किंवा कार्यालयानं खाते पुस्तकांचे आयकर सर्वेक्षण केलं की नाही हे तपासण्यासाठी असतं.
-
सर्वेक्षणादरम्यान कर अधिकारी केवळ कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत तपास करु शकतात.
-
सर्वेदरम्यान अधिकारी केवळ कार्यालयात किंवा कामाच्या ठिकाणी कारवाई करू शकतात.
Amit Shah : BBC वाले २००२ पासून मोदीजींच्या मागे लागले आहेत, पण…
-
आयकर कायदा कलम-132 मध्ये ‘आयकर छापा’ ची व्याख्या आहे.
-
आयकर छाप्यामध्ये कागदपत्रं, मालमत्ता, दागिने आणि अघोषित रोकड अशा गोष्टी जप्त करण्याचा अधिकार असतो.
-
एखाद्या व्यक्तीच्या किंवा व्यवसायाच्या इमारतीवर, घरावर किंवा कोणत्याही प्रकारच्या ठिकाणांवर कारवाई केली जाऊ शकते.
-
आयकर छाप्यांमध्ये वेळेची कोणतीही सक्ती नसते.
ADVERTISEMENT