ADVERTISEMENT
बीड जिल्ह्यातल्या परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरात घुसून दिव्यांग मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली.
आई वडील मजुरीकरिता शेतात गेले असल्याने दिव्यांग मुलगी ही घरी एकटीच झोपलेली होती.
दुपारी घरी कोणीही नसताना, आरोपी पवन उखंडेने तिच्यावर बळजबरी लैंगिक अत्याचार केले.
दिव्यांग मुलीच्या घराशेजारीच पवन विश्वनाथ उखंडे हा राहतो. तो नेहमी त्यांच्या घरी येत होता.
याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.
अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ या कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
विशेष म्हणजे मुलीने जबाब दिल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांत तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
या प्रकरणी आरोपीला २५ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
हा निकाल अंबाजोगाई येथील अप्पर सत्र न्यायाधीश श्रीमती संजश्री.जे.घरत यांनी दिला आहे.
ADVERTISEMENT