बीड जिल्ह्यात एका शेतकऱ्याने आपल्या शेतात आंतरपीक म्हणून गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातल्या हाळंब गावात हा प्रकार घडला असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
ADVERTISEMENT
हाळंब परिसरातील शेतात गांजाची लागवड केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सरकारी पंचांसह पाहणी केली असता त्यांना शेतात मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड आढळून आली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी या कारवाईत चार शेतकऱ्यांच्या शेतात छापेमारी करत १० लाख रुपये किमतीचा दोन क्विंटल गांजा जप्त केला. शेतकऱ्यांनी तूर आणि कापसाच्या पिकात गुप्त पद्धतीने गांजाचं आंतरपीक घेतलं होतं. पोलिसांच्या या कारवाईमुळे परळी भागात मोठी खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT