राणीच्या बागेत आलाय नवीन पाहुणा, महापौरांनी केलं बछड्याचं नामकरण

मुंबई तक

• 10:11 AM • 18 Jan 2022

मुंबईच्या वीर जीजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयात नुकतच एका नवीन पाहुण्याचं आगमन झालं आहे. बंगाल वाघाची जोडी शक्ती (नर) आणि करिष्मा (मादी) यांनी १४ नोव्हेंबर रोजी एका मादी बछड्याला जन्म दिला. या बछड्याचं आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याहस्ते नामकरण करण्यात आलं. या मादी जातीच्या बछड्याला वीरा हे नाव देण्यात आलंय. १५ वर्षानंतर दि. १२ […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

मुंबईच्या वीर जीजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयात नुकतच एका नवीन पाहुण्याचं आगमन झालं आहे.

बंगाल वाघाची जोडी शक्ती (नर) आणि करिष्मा (मादी) यांनी १४ नोव्हेंबर रोजी एका मादी बछड्याला जन्म दिला.

या बछड्याचं आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याहस्ते नामकरण करण्यात आलं. या मादी जातीच्या बछड्याला वीरा हे नाव देण्यात आलंय.

१५ वर्षानंतर दि. १२ फेब्रुवारी २०२० रोजी औरंगाबाद येथील सिद्धार्थ गार्डन प्राणीसंग्रहालयातून बंगाल वाघाची जोडी शक्ती (नर ) व करिष्मा ( मादी) मुंबईच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयामध्ये आणण्यात आली.

वाघाकरिता नवीन तयार करण्यात आलेल्या प्रदर्शनीमध्ये नैसर्गिक अधिवास निर्मिती धबधबा, पारदर्शक काचेची प्रदर्शनी, अनुकूल लँण्डस्केप इत्यादी तयार करण्यात आले असून या अत्यंत अनुकूल अश्या प्रदर्शनीमध्ये या बंगाल वाघाच्या जोडीने एका मादी बछड्याला जन्म दिला आहे.

वाघीण करिष्मा व बछडा “वीरा” सुखरूप असून बछडा आता दोन महिन्याचे झाले आहे. वाघीण करिष्मा तिच्या बछडयाची व्यवस्थित काळजी घेत असून बछड्याची उत्तम वाढ होत आहे.

“वीरा” सहा महिन्यांची होईपर्यंत तिला पशुवैद्यकांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असून तिला जंताची औषधे व लसीकरण करण्यात येत आहेत.

पशुवैद्यकांच्या उपस्थितीत फक्त प्राणीपालास बछड्याजवळ जाण्याची परवानगी देण्यात आली असून तिला कोणत्याही प्रकारची बाधा होणार नाही, याची काळजी घेण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले.

या रुबाबदार बछड्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे

मादी वाघ आपल्या या बछड्याची खास काळजी घेताना दिसत आहे.

मोठ्या कालावधीनंतर राणीच्या बागेत वाघाच्या बछड्याचं आगमन झाल्यामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे.

हा बछडा आपल्या आईच्या तालमीत प्रशिक्षण घेतोय. डरकाळी फोडणाऱ्या आपल्या बछड्याकडे पाहणारी आई

    follow whatsapp