शिवसेनेत फूट पडली. शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा राजकीय संघर्ष सुरू झाला. या राजकीय संघर्षात आता शिवसेनेतील नेत्यांकडून थेट भाजपलाच निशाणा बनवलं जाताना दिसत आहे. शिवसेनेचे प्रवक्ते भास्कर जाधव यांनी शिवसेनेतील बंडावरून अमरवेलीची उपमा देत भाजपवर टीकास्त्र डागलं आहे.
ADVERTISEMENT
चिपळूणमध्ये माध्यमांशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले, “भारतीय जनता पार्टी हा पक्ष म्हणजे अमरवेल आहे. ज्या झाडावर तो वाढण्याचा प्रयत्न करतो, स्वतः वाढतो. स्वतः फुलतो, फळतो, बहरतो आणि हिरवागार होतो आणि त्याच झाडाला खातो. ही भारतीय जनता पार्टीची जुनीच कार्यपद्धती आहे. म्हणून जे भाजपच्या पोटात होतं ते सुशील मोदींच्या ओठातून आलं”, अशी टीका शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केली.
भाजप हा अमरवेल; शिवसेनेतील बंडानंतर भास्कर जाधवांची तिखट प्रतिक्रिया
सुशील कुमार मोदी यांच्या विधानावर भास्कर जाधव म्हणाले, “भाजपने ज्या ज्या पक्षाशी मैत्री केली. त्या त्या पक्षांच्या मदतीने आपला विस्तार कायम केला. भाजपने जनाधार निर्माण केला. ज्या मित्रपक्षाने आपल्याला सहकार्य केलं, तो मित्रपक्षच कसा संपवायचा, याचीच व्यूहरचना ते सातत्यानं करत आले आहेत. हीच रणनीती त्यांची सातत्यानं सुरू असते”, अशा शब्दात भास्कर जाधव यांनी भाजपवर टीकेची तोफ डागली.
Mood Of The Nation : आताच लोकसभेच्या निवडणुका झाल्या, तर महाराष्ट्रात भाजपसाठी धक्कादायक चित्र
सुशील कुमार मोदींच्या विधानावर भास्कर जाधव काय म्हणाले?
“सुशील कुमार मोदी बिहारमध्ये म्हणाले की, शिवसेनेला आम्ही फोडलं. भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा आज संपूर्ण देशासमोर आलेला आहे. काल-परवापर्यंत म्हणत होते की, आम्ही कोणत्याही प्रकारे एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या पाठीमागे नाही. आमचा काहीही हात नाही. पण, परतु जे भाजपच्या पोटात होतं, सुशील कुमार मोदींच्या रुपाने ओठावर आलं आणि अख्ख्या देशाला भाजपचा काळाकुट्ट झालेला चेहरा बघायला मिळाला”, असं भास्कर जाधव म्हणाले.
शिंदे गटातील शिवसेना आमदारांचा राष्ट्रवादीवर इतका राग का?; जयंत पाटलांनी सांगितलं कारण
shiv sena split : सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबद्दल भास्कर जाधवांना कसली शंका?
सर्वोच्च न्यायालयातील शिवसेनेसंदर्भातील सुनावणीबद्दल भास्कर जाधव यांना विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेची बूज राखली गेली. नैसर्गिक न्याय केला गेला. कायदेशीर बाबींची बूज राखली गेली आणि कायदेशीर गोष्टींचा जर विचार केला गेला, तर शिवसेना उद्धव ठाकरेंची होईल. याचीच काही लोकांना भीती वाटतेय आणि म्हणून हे प्रकरण लांबवणीवर पडतंय की काय, ही शंका येते”, असं मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केलं.
ADVERTISEMENT