मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अखेरीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद येतील जाहीर सभेत बोलत असताना मशिदीवरील भोंगे आणि धार्मिक स्थळांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं समजतंय. औरंगाबादच्या सीटी चौक पोलीस ठाण्यात कलम १५३ अंतर्गत पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
याव्यतिरीक्त औरंगाबाद पोलिसांनी IPC च्या 116, 117, 135 या कलमाअंतर्गतही राज यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सभेचे आयोजक राजीव जेवळीकर व इतरांवर हा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अडचणी वाढणार आहेत. १ मे रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या दिवशी राज ठाकरेंनी औरंगाबादच्या सांस्कृतिक मैदानावर सभा घेतली होती.
1 मे ला औरंगाबादच्या जाहीर सभेत बोलत असताना राज ठाकरेंनी यांनी केलेलं वक्तव्य त्यांना चांगलंच भोवलं आहे. औरंगाबादची सभा घेण्याआधी पोलिसांनी राज ठाकरेंना 16 अटी घालून दिल्या होत्या. ज्यात सामाजिक सलोखा बिघडणार नाही, दोन जाती-धर्मांमध्ये द्वेष निर्माण होईल असं भाषण करणार नाही अशा अटींचा समावेश होता.
उद्यापासून गोंगाट बंद होईल अशी आशा बाळगते! प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत
परंतू भाषणादरम्यान औरंगाबादमध्ये मशिदीवर अजान सुरु झाल्यानंतर राज ठाकरे चांगलेच संतापले. यावेळी पोलिसांना राज ठाकरेंनी हा आवाज त्वरित बंद करा. यांच्या तोंडात बोळे कोंबा. सरळ शब्दांत सांगून समजणार नसेल तर एकदा काय व्हायचंय ते होऊन जाऊ द्या असं विधान राज यांनी केलं होतं.
राज यांचं हेच विधान त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पुरेसं ठरलंय अशी चर्चा आहे. आज मुंबईत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि महाराष्ट्राचे DG रजनीश सेठ यांची बैठक झाली. या बैठकीनंतर राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला आहे.
पाहा पोलीस महासंचालक नेमकं काय म्हणाले:
‘कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी स्पष्ट आदेश दिले आहेत. सामाजिक एकोपा ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर अनेक बैठका घेण्यात आल्या आहेत. एसआरपीएफ आणि होमगार्ड मोठ्या प्रमाणात संपूर्ण राज्यात तैनात करण्यात आले आहेत. कायद्याची अंमलबजावणी ही पोलिसांची जबाबदारी आहे. त्यामुळे कोणीही कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.’
‘औरंगाबादचे पोलीस आयुक्तांनी राज ठाकरेंच्या भाषणाबाबत संपूर्ण अभ्यास केलेला आहे. त्या भाषणाच्या अनुषंगाने जी आवश्यक कारवाई करायची आहे त्यासाठी ते सक्षम आहेत आणि ते ती करतील.’
‘कोणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांच्याविरोधात कडक कारवाई करु. आमच्या 87 एसआरपीएफ कंपन्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी तैनात आहेत. सर्व पोलिसांना सूचना दिल्या आहेत की, कायदा आणि सुव्यवस्था बिघडू देऊ नका.’
‘राज्यात मोठ्या प्रमाणात एसआरपीएफ आणि होमगार्ड तैनात आहेत. सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व अधिकारी आणि कर्मचारी हे बंदोबस्तावर आहेत. आज ईद शांततेत पार पडली आहे.’
‘महाराष्ट्रातील पोलिसांना स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. पोलीस हे रेडी मोडमध्ये आहेत. जे कोणी कायदा-सुव्यवस्था खराब करतील त्यांच्यावर कठोर कारवाई होईलच.’
‘मी आपल्याला आधीच सांगितलं आहे की, औरंगाबाद पोलीस आयुक्त हे याची चौकशी करुन आवश्यक कारवाई आजच करतील. ते कारवाई करण्यात सक्षम आहेत. याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरु झाली आहे.’ अशी माहिती यावेळी महासंचालक रजनीश शेठ यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT