भरत केसरकर, प्रतिनिधी, सिंधुदुर्ग
ADVERTISEMENT
भाजप आमदार नितेश राणे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन फेटाळला आहे. त्यामुळे आता नितेश राणेंच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. नितेश राणे यांचा जामीन आधीही फेटाळण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने त्यांना सिंधुदुर्ग न्यायालयात हजर होऊन जामिनासाठी अर्ज करण्यास सांगितलं होतं. त्यामुळे नितेश राणे कोर्टात हजर झाले होते. त्यांनी जामिनासाठी अर्जही केला होता. मात्र तो आता फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे नितेश राणेंच्या अडचणी वाढल्या आहेत.
नितेश राणे यांचे वकील काय म्हणाले?
हा निकाल आम्हाला अनपेक्षित आहे. आम्हाला खात्री होती की जिल्हा सत्र न्यायालयात नितेश राणे यांना जामीन मिळेल. मात्र हा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आम्ही उद्या किंवा परवा मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात दाद मागणार आहोत पोलीस नितेश राणेंना अटक करू शकत नाहीत. कारण सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दहा दिवसाचा अटक न करण्याचा संरक्षण दिले. अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांचे वकील अॅडव्होकेट सतीश मानशिंदे यांनी दिली आहे
नितेश राणे आणि आदित्य ठाकरे यांच्यातला संघर्ष
नेमका कधी आणि कसा सुरू झाला?
काय आहे प्रकरण?
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे वादाच्या भावर्यात आडकले आहेत. 18 डिसेंबर 2021 रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली आहेत. मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले आहे. सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रकरणात नितेश राणेंची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT