बारामती: सुप्रिया सुळेंच्या बारामती मतदार संघाची मागच्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या खांद्यावर बारामती लोकसभा मतदार संघाची जबाबदारी दिली आहे. तेव्हापासून बारामती लोकसभा मतदार संघ चांगलाच चर्चेत आहे. आता भाजपचे आमदार राम शिंदे यांच्या खांद्यावर निर्मला सितारामन यांना बारामती समजवण्याची विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदाची जबाबदारी राम शिंदेंच्या खांद्यावरती देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
आमदार राम शिंदे काय म्हणाले?
”बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदाची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली आहे. 22, 23 व 24 सप्टेंबर रोजी निर्मला सितारमन बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. 6 सप्टेंबर रोजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा बारामती दौरा आहे. यामध्येच निर्मला सितारमन यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर होईल” असं राम शिंदे म्हणाले आहेत.
पुढे राम शिंदे म्हणाले ”बारामती लोकसभा मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रीत केलं आहे. कोणत्याही परिस्थितीत लोकसभेची निवडणूक जिंकायचीच त्यामुळे आम्ही तयारी करत आहोत. 2014 आणि 2019 ची निवडणुक आम्ही हरलो. 2024 चा उमेदवार ठरवायचा आहे. 2014 ते 2024 या काळात प्रचंड बदल झाला आहे. जर आम्ही अमेठी जिंकू शकतो तर बारामतीही जिंकू शकतो. सुप्रिया सुळे यांनी वाईनाड सारखा मतदार संघ शोधावा.”
”बारामती काय अजित पवारच्या बापाची आहे का?”, दादा पत्रकारांवरती का भडकले?
निर्मला सितारामन यांच्या दौऱ्यावर काय म्हणाले अजित पवार?
केंद्रीय मंत्री निर्मला सितारमन यांना बारातमी लोकसभेची जबाबदारी दिल्या नंतर पत्रकांरानी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना अजित पवार म्हणाले ”अमुक अमुक बारामतीला येणार आहेत, तुम्हचे काय म्हणनं आहे, येऊदे ना बारामतीला बारामती काय अजित पवारच्या बापाची आहे का? ती सर्वाची आहे. उद्या तुम्हाला ही वाटलं तर तुम्ही पण येणार ना आणि आलेल्यांचं स्वागत करणं ही आपली परंपरा आहे. त्यात वाईट वाटायचं काय कारण आहे. कोणी नेते महाराष्टात आले येऊद्या त्यांचा अधिकार आहे. आम्ही कधी दुसऱ्या राज्यात गेलो तर ते म्हणतात का अजित पवार इकडे कशाला आले. म्हणुन पत्रकारांना माझी हात जोडुन विनंती आहे तुम्हाला काही दाखवायला नसेल तर असले काही दाखवू नका” असं म्हणत अजित पवारांनी पत्रकारांना खडसावलं आहे.
ADVERTISEMENT