उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल आज लागले आहेत, ज्यात अपेक्षेप्रमाणे योगी आदित्यनाथ यांच्या भाजप सरकारने बाजी मारत सत्ता स्थापनेकडे वाटचाल केली आहे. उत्तर प्रदेशात आज भाजपच्या विजयोत्सवात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आठवण आली आहे. नोएडा विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार पंकज सिंह यांनी ऐतिहासीक विजयाची नोंद केली.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार पंकज सिंह यांनी समाजवादी पक्षाचे उमेदवार सुनील चौधरी यांचा 1 लाख 81 हजारांपेक्षा जास्त मताने पराभव केला. विधानसभा निवडणुकीच्या इतिहासातला हा सर्वात मोठा विजय मानला जातो आहे.
उत्तर प्रदेशात पुन्हा ‘योगीराज’, लखनऊत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
याआधी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवण्याचा रेकॉर्ड उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर जमा आहे. अजित पवारांच्या नावावर 1 लाख 65 हजार मताधिक्यांनी विजयाचा विक्रम जमा होता. हा विक्रम पंकज सिंह यांनी मोडला आहे. संध्याकाळी साडेपाच वाजता पंकज सिंह यांना 2 लाख 44 हजार 91 मत मिळालेली असून सपाच्या सुनील चौधरी यांना 62 हजार 722 मतं मिळाली आहेत.
पंजाबमध्ये झटका; उत्तर प्रदेशात सुफडा साफ; काँग्रेस करणार आत्मचिंतन
नोएडा विधानसभा मतदारसंघ हा उत्तर प्रदेशातला महत्वाचा मतदारसंघ मानला जातो. 2017 साली झालेल्या निवडणुकीत पंकज सिंह यांना बहुमत मिळालं होतं. त्या निवडणुकीत पंकज सिंह यांना 1 लाख 62 हजार मतं मिळाली होती. गेल्या पाच वर्षांत पंकज सिंह यांनी मतदारसंघावर पकड मजबूत ठेवल्यामुळे त्यांना या निवडणुकीत मोठा फायदा होताना दिसला आहे. त्यामुळे आजच्या निवडणुकीत भाजपच्या विजयासोबत अजित पवारांची चर्चा रंगते आहे.
ADVERTISEMENT