…अन् 400 कोटींचा घोटाळा, हे पटतंय का?, एकनाथ खडसेंचा उद्विग्न सवाल

मुंबई तक

03 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:23 AM)

Eknath Khadse : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. मुक्ताईनगरचे भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्यावर आरोप केल्यानंतर या आरोपांच्या चौकशीची कार्यवाहीही सुरू झालीये. भाजप आमदाराकडून करण्यात आलेल्या आरोपानंतर आता एकनाथ खडसेंनी उद्विग्न सवाल केला आहे. भाजपचे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी लक्षवेधीद्वारे याबद्दलचा सवाल उपस्थित करत चौकशीची […]

Mumbaitak
follow google news

Eknath Khadse : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. मुक्ताईनगरचे भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्यावर आरोप केल्यानंतर या आरोपांच्या चौकशीची कार्यवाहीही सुरू झालीये. भाजप आमदाराकडून करण्यात आलेल्या आरोपानंतर आता एकनाथ खडसेंनी उद्विग्न सवाल केला आहे.

हे वाचलं का?

भाजपचे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी लक्षवेधीद्वारे याबद्दलचा सवाल उपस्थित करत चौकशीची मागणी केली होती. पाटलांच्या आरोपानंतर महसूल विभागाने या प्रकरणात लक्ष घातलंय. सोमवारीच (2 डिसेंबर) अधिकारी मुक्ताईनगरमध्ये दाखल झाले होते.

Eknath Khadse : ४०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; अधिकाऱ्यांचं पथक जळगावमध्ये

चंद्रकांत पाटलांनी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या नावावर असलेल्या 33 हेक्टर 41 आर जमिनीवर 400 कोटींच्या गौण खनिज उत्खनन घोटाळ्याचा आरोप केलेला आहे. या आरोपांवर आता एकनाथ खडसेंनी मौन सोडलंय.

400 कोटींच्या घोटाळ्यांच्या आरोपावर एकनाथ खडसे काय म्हणाले?

मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांनी केलेल्या आरोपांवर एकनाथ खडसे म्हणाले, “चार कोटींची जमीन आणि चारशे कोटींचा घोटाळा हे मनाला पटणार आहे का? हे गौण खनिज राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी वापरण्यात आलं. मी महसूल मंत्री असताना त्याबाबतचे आदेश काढले होते. मी कोणत्याही पद्धतीचे नियमबाह्य काम केलेलं नाही”, असं एकनाथ खडसे म्हणाले.

भूविज्ञान गौण खनिज विभागाद्वारे जमिनीचे मोजमाप

जळगाव मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आरोपानंतर, मुक्ताईनगर येथे भूविज्ञान गौण खनिज विभागाचे पथक आले होते. या पथकाकडून जमिनीचे मोजमाप करण्यात आले.

पथकाकडून जमिनीची मोजणी करण्यात आली, त्यावरही खडसेंनी भूमिका मांडलीये. ते म्हणाले की, “ज्या जमिनीची पाहणी केली जात आहे. ती जमीन राष्ट्रीय महामार्गासाठी मी किंवा माझ्या कुटुंबाला नव्हे तर शंभर ते दीडशे शेतकऱ्यांनी दिली आहे. जमीन सपाट करून शेतीसाठी तिचा उपयोग व्हावा हाच त्यामागचा उद्देश होता. यात कुठलाही व्यवहार झालेला नाही. त्यामुळे उत्खनन कशातून झालं किती झालं याची चौकशी करावी या चौकशीतून काय आहे ते बाहेर येईल.”

एकनाथ खडसे पुढे म्हणाले, “खनिकर्म विभागाने याबाबत चौकशी केली आहे. त्यावेळी 20 हजार ब्रॉस काढल्याचा अहवाल आहे. त्यामुळे 20 हजार ब्रॉस रॉयल्टी भरल्याचा आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने मोफत नेल्याचा पुरावा आहे. यात भ्रष्टाचार कुठे आहे? 4 कोटींची जमीन आणि ४०० कोटींचा गैरव्यवहार कसा? मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे”, असा आरोप एकनाथ खडसेंनी केलाय.

    follow whatsapp